Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
'त्या' आश्रमशाळेला मिळणार नोटीस..!

'त्या' आश्रमशाळेला मिळणार नोटीस..!

तभा वृत्तसेवा

कळंब,

Ashram School Corruption मोठे राजकीय प्रस्थ असलेल्या तथा सत्तेच्या जोरावर आपण काहीही करू, या मग्रुरीमुळे नावाजलेल्या आश्रमशाळांमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याची बातमी 'तरुण भारत'ने नुकतीच प्रकाशित केली.

या बातमीची दखल प्रशासनाने घेतली असून या अनुदानित शाळेस नोटीस बजावण्याची रीतसर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे इतरही अनुदानित आश्रमशाळांचे धाबे दणाणले आहेत.

काही दिवसांपूर्वी या धनाढ्य तथा सत्तासंपन्न असणाèया संस्थेच्या अनुदानप्राप्त आश्रमशाळेवर पांढरकवडा येथून प्रशासकीय तपासणी पथक येऊन गेले. त्यांनी या शाळेची झडाझडती घेतली असून त्यांना या व्यवस्थापनामध्ये मोठ्या त्रुटी दिसून आल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच आदिवासी प्रकल्प कार्यालय संबंधित आश्रमशाळेवर कारवाई करणार हे अपेक्षित आहे.

आदिवासी मतदारसंघ असलेल्या या भागातील शाळांना मोठ्या प्रमाणात अनुदान निधी प्राप्त होत असल्याने या आश्रमशाळा भ्रष्टाचाराचे मोठे कुरण ठरत आहेत. विद्यार्थी मात्र दबक्या आवाजात, आम्ही सांगणार नाही, परंतु आम्हाला आश्रमशाळेत जे पाहिजे ते मिळत नाही, असे सांगतात.

या एकंदरीतच भोंगळ कारभाराला आदिवासी व पुरवठा विभागांनी लगाम लावण्याची नितांत गरज आहे. विद्यार्थ्यांनी शाळेत काय मिळते, काय मिळत नाही याविषयी कुठेही वाच्यता करू नये, अशी तंबी शिक्षकांकडून दिली जात असल्याचीसुद्धा माहिती आहे. त्यामुळेच अशा आश्रमशाळांवर वचक बसणार की त्या मोकाट सुटणार, याकडे सध्या तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून आहे.

कारवाई होइलच

माझ्या विभागाचे पथक आष्टी येथील शाळेवर गेली होती त्यांच्याकडून काय नेमका अहवाल प्राप्त झाला आहे ते पाहतो आणि खरंच विद्यार्थ्यांची गैरसोय असेल तर मी शाळा व्यवस्थापनाला नोटीस देतो. अशा आश्रमशाळांवर उचित कारवाई करण्याचे आदेशित करण्यात येईल.

रेवैया डोंगरे

एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी, पांढरकवडा

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur