Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उग्रवादी कमांडरला अटक मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

उग्रवादी कमांडरला अटक मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

नवी दिल्ली

KCP commander दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल, मणिपूर पोलिस आणि केंद्रीय यंत्रणांच्या संयुक्त कारवाईत प्रतिबंधित उग्रवादी संघटना KCP (कांगलीपाक कम्युनिस्ट पार्टी) चा प्रमुख कमांडर हाओबिजम दिलीप सिंह याला दिल्लीत अटक करण्यात आली आहे.

राजधानीत गुप्त बैठकीसाठी आलेल्या या उग्रवाद्याच्या अटकेनंतर सुरक्षा यंत्रणांनी मोठा कट उधळून लावल्याचे मानले जात आहे. या प्रकरणामुळे देशाच्या सुरक्षेविषयी नव्याने चिंता व्यक्त केली जात असून दिल्लीही उग्रवाद्यांच्या निशाण्यावर होती का, याचा तपास आता केंद्रीय तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या हाओबिजम दिलीप सिंह याच्याविरोधात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (UAPA) अंतर्गत डझनभराहून अधिक गुन्हे नोंद आहेत. तो अनेक वर्षांपासून सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. दिल्लीत त्याच्या उपस्थितीमागील उद्देश, त्याचे संपर्क आणि संभाव्य कट याबाबत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.गिरफ्तारीनंतर आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार मणिपूरमधील काकचिंग परिसरात मोठी शोधमोहीम राबवण्यात KCP commander आली. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रे, दारुगोळा आणि स्फोटक साहित्य जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये एक AK-56 रायफल, एक Amogh रायफल, एक AI रायफल तसेच स्कोप लावलेली M4 रायफल यांचा समावेश आहे. याशिवाय INSAS, AK, SLR, M4 आणि LMG रायफल्सच्या अनेक रिकाम्या मॅगझिन्सही जप्त करण्यात आल्या.सुरक्षा दलांना ५१ HE बॉम्ब, दोन पॅरा बॉम्ब, ११ डेटोनेटर आणि चार लेथोड शेलही सापडले आहेत. विविध प्रकारच्या रायफल्ससाठी वापरल्या जाणाऱ्या सुमारे दोन हजार जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये Amogh, INSAS, AK, .303 आणि SLR रायफल्सच्या दारुगोळ्याचा समावेश आहे.कारवाईदरम्यान विविध रंगांच्या बॅगा, ताडपत्री, प्लास्टिक पिशव्या तसेच Redmi 13C हा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. या मोबाईलमध्ये Airtel आणि Jio कंपनीचे सिमकार्ड वापरण्यात येत असल्याचे तपासात समोर आले आहे. सुरक्षा यंत्रणा या मोबाईलमधील माहितीचे तांत्रिक विश्लेषण करत असून उग्रवादी नेटवर्कच्या इतर दुव्यांचा शोध घेत आहेत.दरम्यान, मणिपूरमधील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. देशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणण्याचा कट रचला जात होता का, याचाही तपास सुरू असून केंद्रीय यंत्रणा या प्रकरणातील प्रत्येक पैलूची कसून चौकशी करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur