Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उष्माघाताने आणखी दाेघांचा मृत्यू ?

उष्माघाताने आणखी दाेघांचा मृत्यू ?

अनिल कांबळे

नागपूर,

Heatstroke उन्हाचा तडाखा वाढत असताना हक्काचा निवारा नसल्याने झळा बसून दाेन आणखी दाेन जणांचा अकाली मृत्यू झाला. इमामवाडा आणि साेनेगाव पाेलीस हद्दीत बेवारसस्थितीत बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या दाेघांनाही पाेलिसांच्या मदतीने रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासून मृत घाेषित केले.

या दाेन्ही मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नसून मृत्यूचे नेमके कारण शाेधण्यासाठी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेडिकल रुग्णालयाला पाठवण्यात आले. ईमामवाडा पाेलीस हद्दीतील सरदार पटेल चाैकात पदपथावर अंदाजे 65 वर्षे वयाचा एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत पडल्याचे दिसले. पाेलीसांनी मेडीकल रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषीत केले.heatstroke ओळख अद्याप पटलेली नाही. साेनेगाव पाेलीस हद्दीतील मिहान उड्डाणपुलाखाली अंदाजे 50 वर्षे वयाेगटातला व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळला. त्यांना एम्स रुग्णालयात नेले असता, डाॅक्टरांनी मृत घाेषीत केले. मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. या दाेन्ही प्रकरणात पाेलिसांनी आकस्मात मृत्यूची नाेंद करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur