Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वडकीत स्मार्ट मिटर बायपासचे मोठे रॅकेट ?

वडकीत स्मार्ट मिटर बायपासचे मोठे रॅकेट ?

वरिष्ठांनी तातडीने चौकशी करावी : नागरिकांची मागणी

तभा वृत्तसेवा

राळेगाव,

Major smart meter वडकी येथे स्मार्ट मिटर बायपास करून मोठ्या प्रमाणात वीजचोरी होत असल्याचे गंभीर आरोप समाज माध्यमावर प्रसारीत झालेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमधून समोर आले आहेत.

या ऑडिओत एका वीज ग्राहक व मिटर रिडिंग घेणाèया व्यक्तीमधील संभाषण असल्याचा दावा केला जात असून त्यामध्ये महावितरणच्या कार्यपद्धतीबाबत अनेक गंभीर आरोप करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

कथित ऑडिओनुसार, संबंधित वीज ग्राहक आपल्या वीजबिलाच्या संदर्भात मिटर रीडिंग घेणाèया व्यक्तीला विनंती करताना, मला बायपास लाईन नको, पण माझी वीज जोडणी सुरळीत करून द्या, असे सांगत असल्याचे ऐकू येत असल्याचा दावा केला जात आहे. त्याच संभाषणात संबंधित ग्राहकाने वडकीतील काही धाबे, काही बार चालक तसेच काही मोठ्या व्यापाèयांच्या वीज जोडण्या बायपास करून दिल्याचे आरोप केल्याचेही सांगितले जात आहे. या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नाही.

या कथित संभाषणात काही ठिकाणी थेट तार टाकून बेकायदेशीररीत्या वीज वापर होत असल्याचाही उल्लेख असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वडकी परिसरात संघटित पद्धतीने वीजचोरी सुरू आहे का, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याहून धक्कादायक म्हणजे, कथित ऑडिओमध्ये त्या वीज ग्राहकाने महावितरणचे काही कर्मचारी व मीटर रीडिंग घेणारा, काही व्यक्ती संबंधित धाब्यांवर मटणाच्या पार्ट्या करत असल्याचाही दावा करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे वीजचोरीच्या बदल्यात संगनमत किंवा आर्थिक लाभ झाला का, याचीही निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र, या दाव्यांनाही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

गावातील एका ग्राहकाची कथित वीजचोरी उघडकीस आल्यानंतर त्या ग्राहकाने ऑडिओ मधील संभाषणातील व्यक्तीनेच मला सेटिंग करून देण्यात आली होती, असा दावा या कथित ऑडिओमध्ये केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे महावितरणच्या स्थानिक यंत्रणेच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या संदर्भात वडकी येथील महावितरणचे शाखा अभियंता यांना विचारणा केली असता, सध्या शोध मोहीम सुरू असून संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केली जात आहे. दोषी आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur