Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वाहतूक पोलिसांकडून ई-चालान प्रणालीत मोठा बदल

वाहतूक पोलिसांकडून ई-चालान प्रणालीत मोठा बदल

नवी दिल्ली

Delhi traffic police नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दिल्ली वाहतूक पोलिस यांनी आपल्या ई-चालान आणि वाहतूक व्यवस्थापन प्रणालीत महत्त्वपूर्ण तांत्रिक सुधारणा सुरू केली आहे.

या नव्या प्रणालीमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना आता जागेवरच UPI, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे दंड भरण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत वाहतूक पोलिसांच्या तैनात कर्मचाऱ्यांकडे आधुनिक हँडहेल्ड ई-चालान उपकरणे देण्यात आली असून, त्याद्वारे तात्काळ चालान तयार करणे आणि डिजिटल पेमेंट स्वीकारणे शक्य होणार आहे. यामुळे रोख व्यवहारांची गरज कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक वेगवान आणि पारदर्शक होईल.वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त (वाहतूक) विजयंता गोयल आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमारे १,५०० नवीन ई-चालान मशीन दिल्लीभरातील फील्ड अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. या उपकरणांमध्ये गाडी व उल्लंघनकर्त्याचा फोटो घेणे, चालान त्वरित जनरेट करणे, तसेच वाहन टो केल्यास त्याची माहिती संबंधित वाहनमालकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवणे अशा अनेक आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

या नव्या व्यवस्थेमुळे केवळ Delhi traffic police दंड वसुली प्रक्रिया सुलभ होणार नाही, तर नागरिकांना होणारा त्रासही कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. तसेच, जुन्या आणि प्रलंबित चालानांचेही डिजिटल माध्यमातून पेमेंट करणे शक्य होणार आहे.ही ई-चालान प्रणाली आता Bharat Bill Payment System (BBPS) शी जोडण्यात आली असून, कोणत्याही UPI अ‍ॅपद्वारे सुरक्षित आणि सहज पेमेंट करता येईल. यामुळे डिजिटल व्यवहारांना अधिक चालना मिळणार असून संपूर्ण प्रक्रिया एकात्मिक स्वरूपात उपलब्ध होईल.नवीन हँडहेल्ड उपकरणांच्या वापराबाबत सर्व फील्ड अधिकारी, सर्कल ट्रॅफिक इन्स्पेक्टर यांच्यासह कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात आले आहे. या प्रशिक्षणात प्रणालीचे संचालन, डिजिटल पेमेंट प्रक्रिया आणि तक्रार निवारण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur