Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वैभवसाठी सर्वांचे 'स्टँडिंग ओव्हेशन' पण काव्या मारन बसूनच

वैभवसाठी सर्वांचे 'स्टँडिंग ओव्हेशन' पण काव्या मारन बसूनच

मुंबई

Vaibhav Suryavanshi आयपीएल 2026 स्पर्धेतील एलिमिनेटर फेरीत झालेल्या अत्यंत थरारक सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात जोरदार लढत पाहायला मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकत राजस्थानने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि त्यानंतर सामन्याचा संपूर्ण नूरच बदलून गेला.

युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला येत पहिल्या विकेटसाठी अवघ्या 8 षटकांत 125 धावांची वादळी भागीदारी करत हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरशः निष्प्रभ केले.

या भागीदारीदरम्यान वैभव सूर्यवंशीने आक्रमकतेचा कळस गाठत केवळ 29 चेंडूत 97 धावांची वादळी खेळी साकारली. त्याच्या या झंझावातामुळे हैदराबादच्या गोलंदाजांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आणि मैदानावर सामन्याचा ताबा पूर्णपणे राजस्थानच्या बाजूने झुकल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. विशेष म्हणजे त्याने सुरुवातीलाच षटकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला होता, तर अवघ्या 16 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण करून प्रेक्षकांना रोमांचित केले.

सौजन्य सोशल मीडिया

या दरम्यान, हैदराबादच्या गोलंदाजांकडून सातत्याने प्रयत्न सुरू असले तरी वैभवच्या फटकेबाजीसमोर त्यांचे सर्व डावपेच अपुरे ठरत होते. अखेर गोलंदाज प्रफुल्ल हिंगे याने त्याची महत्त्वाची विकेट घेत राजस्थानला मोठा धक्का दिला. या क्षणी वैभवचे शतक केवळ तीन धावांनी हुकल्याने तो काहीसा निराश झाल्याचे दिसून आले.

तथापि, त्याच्या या खेळीचे मैदानात उपस्थित खेळाडूंनी तसेच प्रेक्षकांनीही कौतुक केले. हैदराबादचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा याच्यासह अनेक खेळाडूंनी वैभवच्या झंझावाताला सलाम केला.मात्र या सामन्यातील खेळापेक्षा Vaibhav Suryavanshi आता चर्चेचा विषय ठरला आहे तो हैदराबाद संघाची मालकीण काव्या मारन यांचा प्रतिसाद. वैभव बाद झाल्यानंतर ती स्टँडमध्ये बसलेली असताना तिच्या प्रतिक्रिया देण्याच्या पद्धतीवर सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. काही क्रीडाप्रेमींनी तिच्या बसून टाळ्या वाजवण्याच्या पद्धतीवर नाराजी व्यक्त करत, अशा विक्रमी खेळीचा सन्मान उभे राहून करायला हवा होता, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तिचा हा क्षण कॅमेऱ्यात कैद होऊन सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur