Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वंदे भारत कार्गोपूर्वीच रेल्वेचा विक्रमी वेग!

वंदे भारत कार्गोपूर्वीच रेल्वेचा विक्रमी वेग!

नवी दिल्ली,

Railway-freight-percentage-statistics : भारतीय रेल्वेने जुलै २०२६ या महिन्यात उत्तम कामगिरी नोंदवत मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक या दोन्ही क्षेत्रांत मोठी झेप घेतली आहे.

रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत रेल्वेच्या मालवाहतुकीत ९ टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे. तसेच केवळ एका महिन्यात तब्बल ६३ कोटी प्रवाशांनी रेल्वेने प्रवास केला असून, देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे हा आजही नागरिकांचा मुख्य आधार असल्याचे सिद्ध झाले आहे.

विशेष म्हणजे आगामी काळात 'वंदे भारत कार्गो' गाड्या सेवेत दाखल होणार असून, त्याआधीच रेल्वेच्या मालवाहतुकीचा वेग कमालीचा वाढला आहे. या कालावधीत कोळसा, सिमेंट, अन्नधान्य, खते आणि लोखंड यांसारख्या प्रमुख आणि आवश्यक वस्तूंची मोठ्या प्रमाणावर वाहतूक करण्यात आली. मालवाहतूक आणि प्रवासी संख्येत झालेल्या या अभूतपूर्व वाढीमुळे रेल्वेच्या एकूण उत्पन्नात मोठी भर पडली आहे.

रेल्वे मार्गांचे होत असलेले आधुनिकीकरण, रुंदीकरण आणि गाड्यांच्या संख्येत केलेली वाढ यामुळे भारतीय रेल्वेची क्षमता आणि कार्यक्षमता अधिक बळकट होत असल्याचे या कामगिरीवरून स्पष्ट होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur