Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वन्यजीवांसाठी धावून आले मोरगावचे मावळे!

वन्यजीवांसाठी धावून आले मोरगावचे मावळे!

श्री राजे छत्रपती ग्रुप मोरगांव'चा स्तुत्य उपक्रम

अर्जुनी मोरगाव,

Morgaon Rush to the Aid of Wildlife मे महिन्याच्या प्रखर उन्हामुळे जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोत पूर्णपणे आटले असून वन्यजीवांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे.

या भीषण परिस्थितीची जाणीव ठेवत मोरगाव येथील 'श्री राजे छत्रपती ग्रुप' च्या मावळ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वन्यजीवांसाठी अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबविला.

दिनांक २६ मे रोजी पहाटेच सकाळी ६:३० वाजता ग्रुपचे कार्यकर्ते पाण्याच्या टँकरसह रामघाट जंगल परिसरात दाखल झाले. जंगलातील दुर्गम भागात असलेल्या 'एनाची झरी' या वन्यजीवांच्या प्रमुख पानवठ्यावर टँकरद्वारे पाणीपुरवठा करून संपूर्ण पानवठा भरून काढण्यात आला. Morgaon Rush to the Aid of Wildlife रणरणत्या उन्हात तहानलेल्या वन्यजीवांसाठी हा उपक्रम जीवदान ठरणारा असल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाण्याच्या शोधात वन्यप्राणी अनेकदा मानवी वस्तीकडे वळतात. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढते.

ही गंभीर बाब लक्षात घेऊन ग्रुपच्या मावळ्यांनी निसर्ग आणि वन्यजीवांप्रती आपली जबाबदारी ओळखत श्रमदानातून हा उपक्रमयशस्वी केला. विशेष म्हणजे, श्री राजे छत्रपती ग्रुप मोरगाव हा समूह नेहमीच विविध सामाजिक, पर्यावरणपूरक आणि जनहिताच्या उपक्रमांमध्ये अग्रेसर राहिला आहे. Morgaon Rush to the Aid of Wildlife रक्तदान शिबिरे, पर्यावरण संवर्धन, गरजूंना मदत अशा अनेक विधायक कार्यांद्वारे ग्रुपने समाजात वेगळी ओळख निर्माण केली आहे. वन्यजीव संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे इतर सामाजिक संस्था आणि युवकांना निश्चितच प्रेरणा मिळणार असल्याचे बोलले जात आहे. सामाजिक बांधिलकीसोबतच पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी दाखवलेल्या या संवेदनशीलतेमुळे श्री राजे छत्रपती ग्रुपच्या सर्व मावळ्यांचे परिसरातून जोरदार कौतुक होत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur