Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वर्धेत धानाचे उत्पादन नसताना तांदळाचे व्यापारी!

वर्धेत धानाचे उत्पादन नसताना तांदळाचे व्यापारी!

मोफत धान्य बाजारात

सेलू,

Free Grain in the Market ज्या भागात धान हे पीकच घेतल्या जात नाही त्या भागात तांदळाची बाजारपेठ निर्माण व्हावी, तांदूळ खरेदीसाठी व्यापारी फिरावे व तांदूळ आहे का तांदूळ असा आवाज दिला जावा पण याकडे शासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्वस्त धान्य दुकानात जेव्हा नागरिकांना रेशन दिले जाते तेव्हा याच दुकानापुढे तांदूळ व गहू खरेदी करणारे व्यापारी असतात ग्राहक सुद्धा स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेतले की बाहेर उभ्या असलेल्या व्यापार्‍याला विकतात. मग रेशनची खरोखर गरज आहे का असा संशय व्यत केला जात आहे.

Free Grain in the Market नुकताच तीन महिन्याचा कोटा स्वस्त धान्य दुकानातून मिळाला असल्याने आता हे व्यापारी आपली गाडी घेऊन गावा गावात जात रस्त्याने तांदूळ, गहू आहे का म्हणून दारोदारी आवाज देताना दिसत आहेत. बाजारातील भाव पाहून कमी दराने खरेदी केली जाते. मग, पुरवठा विभाग अशा रेशनचे धान्य खरेदी व विक्री करणार्‍यावर कारवाई का करत नाही हा संशोधनाचा विषय आहे. सेलू तालुयात ही खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे वास्तव चित्र आहे. स्वस्त धान्य दुकानातून जेवढे धान्याचा वाटप केला जातो त्यापैकी बहुतांश धान्य व्यापार्‍याच्या घशात जात आहे. अशा प्रकारची खरेदी करणार्‍यावर शासनाचा अंकुश का नाही हे न समजण्या पलीकडे आहे.

पीक नाही त्याचे व्यापारी दारावर आहे त्याचे गायब् तालुयात कापूस, सोयाबीन, तूर, चणा, आदी पिके शेतकरी घेतात. पण, त्याची खरेदी करण्यासाठी व्यापारी दारावर येताना दिसत नाही. पण, जे पीक घेतले जात नाही ज्याचे उत्पादन येथे होत नसताना तांदूळ खरेदीसाठी गावागावात व्यापारी वाहने घेऊन खरेदीसाठी येतात. मग, हा तांदूळ कोणत्या बाजारपेठेत जातो हा असा प्रश्न उस्स्थित होतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur