Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यापीठ परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

विद्यापीठ परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी भेट दिल्या कुंड्या

नागपूर,

विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने Nagpur University नागपूर विद्यापीठ परिसरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यां विद्यार्थ्यांनी प्र-कुलगुरूंना द्वितीय निवेदन व कुंड्या भेट स्वरुपात दिल्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना दररोज नवनवीन तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. हॉल तिकीटमधील चुका आणि परीक्षा गैरसोयींचा प्रचंड मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.

Nagpur University विद्यार्थ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष घालावे अशी मागणी कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भेटण्यास नकार दिल्यामुळे संतप्त झालेल्या युवा कार्यकर्त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देत आंदोलनस्थळापासून न हटण्याचा निर्णय घेतला. अखेर प्र-कुलगुरु डॉ. पेशवे यांनी विद्यार्थ्यांची भावना लक्षात घेऊन निवेदन स्विकारले. भाजयुमोचे अध्यक्ष सचिन करारे, रितेश पांडे,ऋषभ अरखेल,कुलदीप माटे, प्रशंसा भोयर, शंतनू झाडे, रश्मि बावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. भाजयुमोच्या वतीने स्मरण निवेदन देऊन १० दिवसांची मुदत देण्यात आली. विद्यापीठातील विद्यार्थी समस्यांच्या सोडविण्यासाठी २० कुंड्या देण्यात आल्या तसेच १०० रोपटे देण्यात आले. प्र-कुलगुरु डॉ. पेशवे यांनी विद्यार्थ्यांच्या काही मागण्या अंशतः पूर्ण करीत उर्वरित मागण्या पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur