Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वीज कंत्राटदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

वीज कंत्राटदारांचे बेमुदत कामबंद आंदोलन

नागपूर,

The Electrical Contractors Association प्रलंबित देयके आणि इतर मागण्यांकडे प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागपूर परिसरातील वीज कंत्राटदारांनी बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

द इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन (VECA)च्या वतीने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले.

संघटनेच्या माहितीनुसार, मेंटेनन्स व इतर कामांचे देयक अद्याप थकीत असून त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले आहेत. मुख्य अभियंता व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अनेक बैठका घेऊनही आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेने म्हटले आहे.The Electrical Contractors Association कंत्राटदारांनी २०२४, २०२५ आणि २०२६ मधील मेंटेनन्ससह विविध कामांची थकीत देयके तातडीने अदा करावीत तसेच सध्याच्या बाजारभावानुसार सुधारित दर लागू करावेत, अशी प्रमुख मागणी केली आहे.कामबंद आंदोलनादरम्यान वीज पुरवठ्यात तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची कोणतीही तांत्रिक किंवा आर्थिक जबाबदारी कंत्राटदारांवर राहणार नसून ती संपूर्णपणे वीज वितरण प्रशासनाची असेल, असा इशाराही संघटनेने दिला आहे. प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास नागपूर परिसरातील वीज पुरवठा व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो, असा दावा संघटनेने केला आहे.

सौजन्य :अशोक माटे,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur