Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विश्वविक्रमवीर धावपटू अ‍ॅग्नेस तिरोपची हत्या

विश्वविक्रमवीर धावपटू अ‍ॅग्नेस तिरोपची हत्या

केनिया,

गत महिन्यात 10 किलोमीटर शर्यतीत 30 मिनिट 1 सेकंदाचा विश्वविक्रम नोंदविणारी केनियाची 25 वर्षीय धावपटू अ‍ॅग्नेस जेबेट तिरोपने हिची हत्या करण्यात आली.

या आठवड्याच्या सुरुवातीला तिचा मृतदेह पश्चिम केनियामधील इटेन येथील तिच्या निवासस्थानी आढळला. तिच्या शरीरावर अनेक घातक वार झाले होते. या हत्ये प्रकरणी तिचे पती इमॅन्युएल रोटिच याला मुख्य संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली.

हत्या केल्यानंतर रोटिच देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्नात होता. 2015 मध्ये विश्व क'ॉसकंट्री स्पर्धा पहिल्यांदा जिंकताच तिरोप प्रसिद्धीच्या झोतात आली, कारण त्यावेळी 19 वर्षीय तिरोप विश्व स्पर्धा जिंकणारी सर्वात तरूण धावपटू ठरली होती. केनियाच्या या लांब पल्ल्याच्या धावपटूने जागतिक अजिंक्यपद (2017 आणि 2019) स्पर्धेत 10,000 मीटरमध्ये दोन वेळा कांस्यपदक पटकावले होते. तिने नुकतेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये 5,000 मीटरमध्ये चौथे स्थान मिळविले. तिरोप व 40 वर्षीय रोटिच गत पाच वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. रिलेशनशिपमध्ये होते, परंतु वयाचा फरक लक्षात घेऊन तिच्या पालकांनी लग्नाला मान्यता दिली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur