Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वृक्षकुंपण अभियानाची जांभळपणीत सुरुवात

वृक्षकुंपण अभियानाची जांभळपणीत सुरुवात

नागपूर,

Tree Fence Campaign जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांच्या सहभागातून जांभळपणी गावातील शेतबांधावर सागरगोटीचे रोप लावून वृक्षकुंपण अभियानाला सुरुवात करण्यात आली.

निसर्ग विज्ञान मंडळाच्या पुढाकारातून राबविण्यात येणाऱ्या या अभियानांतर्गत मुनिया संवर्धन राखीव संरक्षित जंगलालगतच्या चार गावांच्या सुमारे पाच किलोमीटर परिघातील शेतबांध व धुऱ्यांवर एक लाख वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि शेतबांध हिरवेगार करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असून स्थानिक नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

सौजन्य :विजय घुगे,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur