तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये लाखो रुपये खर्च करून नाली बांधकाम करण्यात आले. हे अत्यंत निकृष्ट करण्यात आल्याने या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.
मात्र, या निकृष्ट बांधकामाला राजकीय किनार असल्याने यावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येथील प्रभाग क्रमांक 28 मध्ये नाली बांधकाम करण्यात आले आहे. त्याचबरोबर नरेंद्रनगर उमरसरा वार्ड क'मांक 23 व 24 च्या बॉर्डरवरचा रपटा गेल्या कित्येक दिवसांपासून फुटला आहे. परिणामी यावर लहान-सहान अपघात नित्याचे झाले असून, हे कामसुद्धा संबंधित नगरसेवक असलेल्या कंत्राटदारांनीच केले आहे.
अनेक वेळा या परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तोंडी तक्रारसुद्धा केली आहे. मात्र, अद्यापही यावर कोणतीही कारवाई झाली नाही. शहरात मोठ्या प्रमाणात नाली आणि रस्त्यांची कामे संबंधित नगरसेवक कंत्राटदारच करत आहे. ही कामे निकृष्ट असल्याच्या तक्रारीसुद्धा प्रशासनाकडे आल्या आहे. त्यामुळे यावर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
नगरसेवकच बनले कंत्राटदार भाजपामध्ये इतर पक्षांतून आलेले नगरसेवक मोठ्या प्रमाणात कामे घेताते. मात्र, ही कामे निकृष्ट होत असल्याची ओरड नागरिकांमधून होत आहे. तर या प्रकरणात नगर परिषद प्रशासनाकडे तक'ार करण्यात आली आहे. त्यामुळे या निकृष्ट कामांवर पक्षातील वरिष्ठ नेते यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

