Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
योग शिक्षक नामदेव फटिंग यांचा सत्कार

योग शिक्षक नामदेव फटिंग यांचा सत्कार

नागपूर,

Yoga Teacher Namdev Fating रघुजी नगर येथील पंडित दीनदयाल उपाध्याय बगीचा येथे ज्येष्ठ नागरिक मंडळ, दत्तात्रेय नगर-रघुजी नगरचे अध्यक्ष तथा वरिष्ठ योग शिक्षक नामदेव फटिंग यांचा सत्कार करण्यात आला.

प्रभाग क्रमांक ३१च्या नगरसेविका मंगला मस्के यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि तुळशीचे रोप देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना मस्के यांनी ८३ वर्षांच्या वयातही योगाच्या माध्यमातून समाजाला निरोगी जीवनाचा संदेश देणारे फटिंग हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. Yoga Teacher Namdev Fatingकार्यक्रमात हरीश देशमुख, मनोहर धाबेकर आणि भीमराव पाटील यांनी फटिंग यांच्या समाजसेवेचा गौरव केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पद्माकर आगरकर, श्रीराम दुरगकर, मनोहर धाबेकर आणि वंदना तांदुलकर यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांचे आभार भास्कर राघोर्ते यांनी मानले.

सौजन्य:श्रीराम दुरूगकर,संपर्क मित्र

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur