Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
युद्ध सुरू असताना अमेरिकेच्या लष्कर सचिवांचा राजीनामा

युद्ध सुरू असताना अमेरिकेच्या लष्कर सचिवांचा राजीनामा

वॉशिंग्टन,

Resignation of the US Army Secretary इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या प्रशासनात मोठी घडामोड झाली आहे. अमेरिकेचे लष्कर सचिव डॅन ड्रिस्कॉल यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे राजीनामा सादर केल्याचे वृत्त आहे.

सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. ड्रिस्कॉल आणि युद्ध सचिव पीट हेगसेथ यांच्यातील वाढता तणाव लक्षात घेता त्यांचा राजीनामा अनपेक्षित नसल्याचे एका सूत्राने म्हटले आहे.व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या ॲना केली यांनी ड्रिस्कॉल यांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या 'मेकिंग अमेरिका स्ट्राँग अगेन' या अजेंड्याला पुढे नेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे केली यांनी सांगितले. ऐतिहासिक लष्करी मोहिमांदरम्यान ड्रिस्कॉल यांनी प्रभावी नेतृत्व केले, लष्कराची सज्जता आणि संहारक क्षमता वाढवण्यावर भर दिला तसेच रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेला चालना देण्यासाठीही काम केले, असे त्यांनी नमूद केले.

सीएनएनच्या वृत्तानुसार, ड्रिस्कॉल यांच्या राजीनाम्यामागे हेगसेथ यांच्यासोबतचे मतभेद हे प्रमुख कारणांपैकी एक असल्याचे सांगितले जात आहे. इराण युद्धाला सहा महिने उलटत असताना ही घडामोड घडली आहे. याच वर्षाच्या सुरुवातीला हेगसेथ यांनी लष्करप्रमुख जनरल रँडी जॉर्ज यांच्यासह आणखी दोन जनरल्सना त्यांच्या पदावरून हटवले होते. ड्रिस्कॉल आणि जॉर्ज यांनी यापूर्वी एकत्र काम केले होते.माजी आर्मी रेंजर आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट असलेल्या ड्रिस्कॉल यांनी अमेरिकन सैनिकांच्या राहणीमानात सुधारणा करण्याबरोबरच लष्करी उपकरणांचे आधुनिकीकरण आणि युद्धातील व्यावसायिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यावर भर दिला. युक्रेनियन सैन्याकडून मिळालेल्या युद्धातील तंत्रज्ञानविषयक अनुभवांचा वापर अमेरिकन लष्करात करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या नेतृत्वाखाली खासगी कंपन्यांनी अमेरिकन लष्कराच्या तळांवर डेटा सेंटर्स, अत्यावश्यक खनिज शुद्धीकरण कारखाने आणि भोजन सुविधांसाठी २५ अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते.

डॅन ड्रिस्कॉल यांच्या लष्कर सचिवपदाच्या नियुक्तीला अमेरिकन सिनेटने २५ फेब्रुवारी २०२५ रोजी ६६-२८ मतांनी मंजुरी दिली होती. त्याआधी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे नाव लष्कर सचिवपदासाठी पुढे केले होते. माजी सैनिक, गुंतवणूकदार आणि राजकीय सल्लागार अशी ड्रिस्कॉल यांची पार्श्वभूमी आहे. ड्रिस्कॉल यांनी येल लॉ स्कूलमधून पदवी घेण्यापूर्वी 'ऑपरेशन इराकी फ्रीडम'दरम्यान अमेरिकन सैन्यात १० व्या माउंटन डिव्हिजनमध्ये कॅव्हलरी स्काउट प्लाटून लीडर म्हणून सेवा बजावली होती. त्यानंतर त्यांनी व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी क्षेत्रात काम केले. तसेच ते व्हान्स यांचे वरिष्ठ सल्लागार म्हणूनही कार्यरत होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Nagpur