मालेगाव,
आजच्या काळात वाचन संस्कृती ही लोप पावत असून, वाचन संस्कृती टिकविण्या साठी वाचन आवश्यक असताना येणार्या नवीन पिढीला योग्य दिशा देण्यासाठी व त्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी अभ्यासिका केंद्र महत्त्वाचे आहे व यासाठी रामनगर कॉलनीत त्रिमूर्ती अभ्यासिका केंद्राचा उपक्रम हा योग्य व अतिशय चांगला असल्याचे प्रतिपादन मालेगाव पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक Saponi Ingle इंगळे यांनी व्यक्त केले ते आयोजित कार्यक्रमत बोलत होते.
शहरातील आदर्श कॉलनी असणार्या रामनगर येथील त्रिमूर्ती अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन ३ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. त्रिमूर्ती संस्थान रामनगर येथे आयोजित या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रामबाबू मुंदडा हे होते तर या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सहायक पोलिस निरीक्षक इंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रवीकुमार चव्हाण, त्रिमूर्ती संस्थांचे अध्यक्ष मिठूलाल उंटवाल यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता तसेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच यावेळी त्रिमूर्ती अभ्यासिका केंद्र चे रीतसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्रिमूर्ती संस्थानचे सचिव प्रभाकर टवलारकर प्रा, आनंदा देवळे, पारसमल गोलेचा, मोहन मुंदडा, विष्णू मिरासे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा सत्कार त्रिमूर्ती अभ्यासिका केंद्र तसेच रामनगर कॉलनीतील रहिवाशांच्या वतीने करण्यात आला. यावेळी रामबाबू मुंदडा यांनी यांनी अभ्यासिका केंद्र चे उपक्रम हे विद्यार्थ्यांसाठी तरुणांसाठी मुला मुलीसाठी योग्य असून या अभ्यासिका केंद्रात जास्तीत जास्त वेळ देणार्यांना प्रथम १००० हजार रुपये, द्वितीय ७०० रुपये तसेच तृतीय ५०० रुपयाचे बक्षीस हे देण्यात येईल असे जाहीर केले.
Saponi Ingle कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजयकुमार दोडेवार यांनी तर संचालन नागेश कव्हर यांनी तर प्रा. आनंदा देवळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी नितीन टवलारकर प्राचार्य दिनेश उंटवाल, अॅड. आशिष गोलेच्या, मानवतकर, विष्णू मिरासे यांच्यासह इतर कॉलनीतील रहिवाशांनी परिश्रम घेतले. यावेळी अभ्यासिका केंद्रासाठी आर्थिक स्वरूपाची मदत देणार्या सर्व दानदात्यांचे जाहीर आभार नागेश कव्हर यांनी व्यक्त केले.

