Dailyhunt
बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

सोलापूर - बांधकाम कामगार कार्यालयात यापूर्वी खासगी एजंटांचा सुळसुळाट होता .यामुळे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. खासगी एजंटांच्या गराड्यात बांधकाम कामगार कार्यालयाचे कामकाज चालत होते.

त्यामुळे भांडी वाटप, शिष्यवृत्ती अनुदान व वैद्यकीय उपचार बिल यामध्ये भ्रष्टाचार सुरु होता . त्यामुळे सर्व एजंटांना कार्यालयात बंदी केल्यामुळे भ्रष्टाचार विरहीत पारदर्शक कारभार सुरू असल्याची माहिती सोलापूरचे सहायक कामगार आयुक्त तथा इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा कार्यकारी अधिकारी मंगेश झोले यांनी दिली.

यावेळी सहायक आयुक्त झोले म्हणाले की, बांधकाम कामगार हा सामान्य व गरीब कुटुंबातील सदस्य असतो . एजंट त्यांच्याकडून भरमसाठ पैसे घेऊन कार्यालयात चुकीची कामे करतात. तसेच बांधकाम कामगारांना विविध योजना, शिष्यवृत्ती व वैद्यकीय उपचार बिलाचे आमिष दाखवून नियमबाह्य कामकाज करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे बांधकाम कामगार कार्यालयातही नियमबाह्य कामे झाल्याचे निदर्शनास आले आहे. पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचा बांधकाम कामगार कार्यालय एजंटांच्या विळख्यात सापडला होता. मात्र पदभार घेतल्यानंतर सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांशी सहकार्याने एजंटांना कार्यालयात बंदी केला आहे . तसेच कोणत्याही प्रकारच्या संघटना प्रतिनिधींना बांधकाम कामगारांच्या संदर्भात चौकशी करण्यासही मनाई करण्यात आली आहे . त्यामुळे बांधकाम कामगारांनी प्रत्यक्ष बांधकाम नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्वतःची कामे करून घ्यावीत असे आवाहन झोले यांनी केला आहे.

..
बांधकाम कामगारांनी कार्यालयाशी संपर्क साधावे

यापूर्वी एजंटामुळे बांधकाम कामगार कार्यालयात चुकीची कामे झाल्याने भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. नोंदणी केलेल्या अथवा नूतनीकरणासह बांधकाम कामगार कार्यालयाशी संबंधित कामे असणार्‍या कामगारांनी बांधकाम कामगार कार्यालयातील नोंदणी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कामे करून घ्यावीत . कोणत्याही प्रकारच्या एजंटाची मदत घेऊ नये .

मंगेश झोले, प्रभारी सहायक आयुक्त, बांधकाम कामगार, सोलापूर

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur