Dailyhunt

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

बार्शीत नेत्रदीपक आतषबाजीने भगवंत महोत्सवाची सांगता

बार्शी - ग्रामदैवत श्री भगवंत प्रकट दिनानिमित्त येथील भगवंत मैदान येथे दि. २० एप्रिल पासून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सर्व कार्यक्रमाचा समारोप बुधवार दि. २९ रोजी सायंकाळी भगवंत मैदान येथे भव्य दिव्य नेत्रदीपक आतषबाजीने करण्यात आला. या आतषबाजी सोहळ्याचे आयोजन शिवशक्ती अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या वतीने करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर बँकेचे चेअरमन डॉ. प्रकाश बुरगुटे, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ.बी.वाय. यादव,बँकेचे सर्व संचालक अधिकारी, कर्मचारी व भगवंत महोत्सवाचे अध्यक्ष सुभाष लोढा,युवा नेते रणवीर राऊत बाजार समितीचे सर्व संचालक, बार्शी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, संचालक, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षा तसेच विद्यमान नगरसेवक , पंचायत समितीचे सभापती सदस्य जिल्हा परिषदचे अध्यक्ष सर्व सदस्य व बार्शी शहरातील प्रिंट मीडिया व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व पत्रकार या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते रिमोट कंट्रोल ने आतिषबाजीची सुरुवात करण्यात आली.

या आतषबाजी सोहळ्यामध्ये आष्टी जिल्हा बीड येथील इस्माईल सय्यद, माणकेश्वर येथील स्टार फायर वर्क्स, गणीभाई आतार अस्लम आतार, मेहबूब आतार, बार्शी एस.एम फायर वर्क्स बार्शी शोएब मणियार, सिद्धेश्वर फायर वर्क्स सोलापूर यांनी सहभाग नोंदविला होता. नेत्रदीपक आतिषबाजीने बार्शीकरांचे मनोरंजन आणि डोळ्याचे पारणे फेडले व बार्शीकरांनी टाळ्या वाजवून उस्फुर्त प्रतिसाद दिला.अशा या नेत्रदीपक आतषबाजी सोहळ्याच्या माध्यमातून श्री भगवंत महोत्सवाची गेल्या दहा दिवसापासून चाललेल्या विविध कार्यक्रमाची या निमित्ताने समाप्ती झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर कांबळे यांनी केले.

या भगवंत महोत्सवाचे मुख्य आयोजक माजी आमदार राजेंद्र राऊत व युवा नेते रणवीर राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली झालेल्या या भगवंत महोत्सवाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमास बार्शीकरांनी उपस्थित राहून उस्फूर्तपणे प्रतिसाद दिला व हा सोहळा आयोजित केल्याबद्दल माजी आमदार राजेंद्र राऊत व युवा नेते रणवीर राऊत तसेच भगवंत समितीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभार मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur