Dailyhunt
बसस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

बसस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

सस्थानकावरील व विद्यालयासमोरील अनधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविणयाची मागणी

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय आहे .याठिकाणी पाचवी ते आठवीचे वर्ग भरतात.

हे विद्यालय बसस्थानकापासुन हाकेच्या अंतरावर आहे .याठिकाणी सुसज्ज अशी विद्यालयाची इमारत आहे .परंतू गेल्या काही वर्षांपासून विद्यालयासमोरच अन अधिकृत असे अनेक होर्डिंग्ज लावले जातात .यामुळे बसस्थानकावरुन विद्यालयाची इमारत सुद्धा दिसत नाही अशी विदारक परिस्थिती आहे .

विद्यालयाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे होर्डिंग्ज लावायला सुद्धा याठिकाणी ठेवलेली नाही .तर विद्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे असून सुद्धा या अन अधिकृत होर्डिंग्ज मुळे त्याचे रेकॉर्डिंग सुद्धा करता येत नाही .या होर्डिंग्ज मुळे विद्यालयच दिसत नाही तसेच विद्यालयात चोरी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .शाळा सुरु असताना विद्यार्थी सायकल गेटसमोर लावतात तयाठिकाणाहुन अनेकदा सायकलची चोऱ्या झालेल्या आहेत. विद्यालयासमोरील अन अधिकृत होर्डिंग्ज ताबडतोब हटविण्याची मागणी ग्रामविकास अधिकारी व प्रशासक तसेच पिलीव पोलीस स्टेशनकडे पञादवारे करण्यात आली आहे .

पिलीव येथील अन अधिकृत होर्डिंग्ज बाबत ग्रामपंचायतीने परवानगी घेऊन होर्डिंग्ज लावणे तसेच तो किती दिवस ठेवायचा याबाबत नियमावली केली होती माञ ती नियमावली कागदावरच राहिल्याचे दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur