Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
दक्षिण तालुका अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन

दक्षिण तालुका अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन

दक्षिण तालुका अखिल भारतीय किसान सभेचे अधिवेशन

सोलापूर - अखिल भारतीय किसान सभा दक्षिण सोलापूर तालुका अधिवेशन उत्साहात पार पडले. या अधिवेशनात तालुक्यातील शेतकरी, कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. हमीभाव, कर्जमाफी, वीज दर कमी करणे, सिंचन सुविधा वाढविणे तसेच शेतीमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देणे यासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष म्हणून कॉ. जावेद आवटे, सचिव म्हणून कॉ. भीमाशंकर झळके आणि खजिनदार म्हणून उमेश पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

अधिवेशनास जिल्हा सचिव कॉ. सुलेमान शेख व जिल्हा सहसचिव कॉ. दत्ता चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉ दत्ता चव्हाण यांनी अधिवेशनास मार्गदर्शन केले . यावेळी अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी अधिक ताकदीने लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच सर्व नूतन कमिटी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

नूतन कमिटी खालील प्रमाणे
अध्यक्ष - जावेद आवटे.
उपाध्यक्ष - परमेश्वर पुजारी.
उपाध्यक्ष - सिकंदर मकानदार.
सचिव - भीमाशंकर झळके.
कार्याध्यक्ष.. मल्लिकार्जुन कांबळे.
सहसचिव - चिदानंद बगले.
खाजिनदार - महेश पाटील.
सदस्य - सोमनिंग पुजारी, विश्वनाथ बबलेश्वर, मुझम्मील शेख, शांतकुमार कोष्ठी, श्रीशैल मधभावी, संतोष पुजारी, माळसिद्ध जाधव, फारुख शिकलगार, षडाक्षरी स्वामी, प्रकाश पाटील,आंबाण्णा जोकरे, शिवराज कोरे, गुंडू कोले, श्रीकांत स्वामी, यासिन मकानदार, महासिद्ध माशाळे, सूर्यकांत कुंभार, पैगंम्बर नदाफ, सद्दाम मकानदार, श्रीशैल मुंजे, इकबाल आवटे, मल्लिकार्जुन बिराजदार, तुकाराम मळेवाढी, शिवानंद सालोटगी आदी उपस्थित होते .

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur