Dailyhunt
डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्तच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषक वितरण उत्साहात

डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्तच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषक वितरण उत्साहात

डॉ. आंबेडकर यांच्या जयंती निमित्तच्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषक वितरण उत्साहात

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महापालिका प्राथमिक शिक्षण मंडळ, सोलापूर आणि चित्रस्पर्श कलाविहार यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला बागेमध्ये घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात करण्यात आले.

महानगरपालिका आयुक्त कार्यालयात बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी आयुक्त सचिन ओम्बासे, महापालिकेचे मुख्य लेखा अधिकारी डॉ. रत्नराज जवळगेकर , प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मल्हारी माने , प्रसिद्ध चित्रकार डॉ. सचिन खरात आदी मान्यवर उपस्थित होते. एकूण दोन्ही गटातून प्रथम, ‌द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ 2 व विशेष पारितोषक 5 असे 10-10 पारितोषक देण्यात आले. प्रथम बक्षीस ट्रॉफी, 3 हजार रुपये, प्रमाणपत्र, चित्रकला साहित्य, एक पुस्तक , ‌द्वितीय बक्षीस - ट्रॉफी, 2 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, चित्रकला साहित्य, एक पुस्तक तर तृतीय बक्षीस ट्रॉफी, 1 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र, चित्रकला साहित्य, एक पुस्तक असे बक्षीसाचे स्वरुप होते.

इयत्ता पाचवी ते दहावी विदयार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिचित्र व त्यांच्या जीवनातील एक प्रसंग या विषयावर भव्य चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. सदर स्पर्धा इयत्ता पाचवी ते सातवी एक गट तर आठवी ते दहावी दुसरा गट अशा दोन गटांमध्ये आयोजित करण्यात आले होते. दोन्ही गटांमध्ये मिळून एकूण 300 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविले.

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सहभागी वि‌द्यार्थ्यांचे व पालकांचे सुद्धा विशेष कौतुक केले. सूत्रसंचालन बाळासाहेब जगताप यांनी केले. प्राथमिक शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक सुरेश कासार आणि त्यांचे सहकारी यांनी परिश्रम घेतले.

--

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur