Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
एच.एम. सामाजिक संघटनेच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

एच.एम. सामाजिक संघटनेच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

च.एम. सामाजिक संघटनेच्यावतीने पैगंबर जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर

सोलापूर : पैगंबर जयंतीनिमित्त एच.एम. सामाजिक संघटनेच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

समाजामध्ये रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण करून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक डॉ. किरण देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जुबेरभाई बागवान, ज्ञानेश्वर कारभारी, संघटनेचे अध्यक्ष हुसेन मौलाली बागवान आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भागातील ज्येष्ठ नागरिक व सर्व एच एम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.

रक्तदान हे श्रेष्ठ दान असून, एका व्यक्तीच्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळू शकते. ही सामाजिक जबाबदारी लक्षात घेऊन एच.एम. सामाजिक संघटनेने पैगंबर जयंतीच्या निमित्ताने हा उपक्रम हाती घेतला आहे. या शिबिरात एकूण 65 जणांनी रक्तदान दिले असून सोलापूर ब्लड बँक यांनी रक्त संकलन केले आहे.

या रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी सादीकभाई हुंडेकरी, तोसीफ बिजापूरे, माजीद पटेल , तोफिक (ताज) बागवान, इब्राहिम बागवान, मोहसीन इनामदार, रजाक नालवार, मोमीन बेलमे, लालअहमद शेख, चांद दखणे या सर्वांनी परिश्रम घेतले. शेवटी आभार अध्यक्ष हुसेन मौलाली बागवान यांनी मानले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur