Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

जनमेजयराजेच्या वृक्ष प्रेमामुळे सोलापुर रस्त्यावर बहरली वृक्ष

क्कलकोट - वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी , पक्षी ही सुस्वरे आळविती ….. ध्येयवेडी माणसेच इतिहास घडवितात . असेच ध्येयवेडे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी संपूर्ण जगाला अन्नदान श्रेष्ठ दान दाखवुन मोठी संस्था उभी केली .

सारे विश्व मोठ्या गतीने प्रगती करीत आहे पण आज वसुंधरा धोक्यात आहे . निसर्गाचा मोठा ऱ्हास होतो आहे . पर्यावरण संतुलन बिघडत आहे . पर्यावरण संरक्षण वसुंधरेच संरक्षण वृक्ष लागवड वृक्ष संवर्धनाचे मोठे काम अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले नेटाने करीत आहेत .

सोलापुर रस्त्यावर ११ जाने २०२० रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने मान्यवरांच्या हस्ते लावलेली झाडे आज डौलाने उभी आहेत . बहरली आहेत . जनमेजयराजे भोसले यांची पर्यावरण संरक्षण बाबतची तळमळ ही प्रत्येकाने अंगीकारावी . तालुक्यात वृक्ष लागवड व संवर्धन ही चळवळ जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अधिक व्यापक व गतीने झाल्यास प्रज्ञापुरी अक्कलकोटचे गत वैभव पुन्हा प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही असा आशावाद पर्यावरण प्रेमी नागरिकातून व्यक्त होताना दिसत आहे .

फार नाही तीस ते चाळीस वर्षापूर्वा प्रज्ञापुरी तीर्थक्षेत्र अक्कलकोटी सोलापुर रस्ता कोन्हाळी गावापर्यंत गर्द वडाच्या झाडीचा होता . जमीनीवर सूर्यप्रकाशही पडत नव्हता एवढी दाट झाडी होती . या मार्गावरून प्रवास करणेही भिती वाटायची . हीच परिस्थिती हन्नुर रस्त्याची होती .हन्नुर रस्त्यावरही भले मोठे वडाच्या झाडाची गर्दी होती . मात्र वेळोवेळी रस्ते विकास कामाच्या अनुषंगाने झाडांची मोठी कत्तल झाली मात्र आपण प्रज्ञापुरी अक्कलकोटचे पुर्वीचे वृक्षाचे ते गतवैभव आजही उभे करू शकलो नाही अशी पर्यावरण प्रेमी नागरिकामध्ये व वयोवृद्ध नागरिकामध्ये मोठी खंत आहे . मात्र ध्येयवेडे असलेले श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांनी सहा वर्षापूर्वी सोलापुर रस्त्यावर केलेले वृक्षारोपण वृक्ष संवर्धन पाहता हे चित्र बदलु शकते असा अशावाद निर्माण झाला आहे . सोलापुर रस्त्यावर जनमेजयराजे भोसले यांच्या पुढाकाराने लावालेली झाडे आज डौलाने उभी आहेत . राजे फत्तेसिंह क्रिंडागणावरही जनमेजयराजे भोसले यांच्या पुढाकाराने अन्नछत्र मंडळाने वृक्षारोपण केले . टॅकरने झाडानां पाणी घातले . वृक्ष संवर्धन केले काळजी घेतली क्रीडांगणावर आसन व्यवस्था व संरक्षक भिंतीवर वसुंधरा बजाव 'पर्यावरण बचाव 'पाण्याच महत्व ' शिक्षण आरोग्य 'योग ' याचे महत्व सांगणारी संदेश लिहिली . क्रीडागणाच्या ह्या भिंती बोलक्या केल्या . प्रज्ञापुरी अक्कलकोट तीर्थक्षेत्र नगरीची शोभा वाढली यामुळे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली वृक्ष लागवड व संवर्धनाची ही चळवळ अधिक व्यापक गतीमान व्हावी ही अपेक्षा पर्यावरण प्रेमी नागरीकातून व्यक्त होत आहे .

फोटो > श्री स्वामी समर्थ अनुछत्र मंडळाने वृक्षारोपण संवर्धन सह शहराच्या सौदर्य वाढीसाठी भव्य स्वागत कमानही उभी केली

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur