Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

जोडबसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटवले

सोलापूर : महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने आज शहरातील जोड बसवण्णा चौकातील भाजी मंडई परिसरातील अतिक्रमण हटविले. पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या साह्याने या परिसरातील 14 खोके जागेवरच निष्काशीत करण्यात आली.

सोलापूर शहरात अतिक्रमणाविरोधात महापालिकेने आज जोरदार मोहीम राबविली. या परिसरात महानगरपालिकेच्या भाजी मंडई बाहेरील अतिक्रमित पत्र्याच्या शेडखाली चालणारी हॉटेल्स, खोके, डेरा व मटका विक्रीची दुकाने यांच्यावर अतिक्रमण विभागाने जेसीबी फिरविला. तब्बल १४ खोके पूर्णपणे निष्काशीत केली. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने थेट जेसीबीच्या साहाय्याने कारवाई धडक कारवाई केली.

दरम्यान, आम्ही अनेक वर्षांपासून येथे व्यवसाय करतो, आमच्याकडे जुन्या दंडाच्या पावत्या आहेत अशी विनंती काही दुकानदारांनी केली. यावर स्पष्ट भूमिका घेत बनसोडे म्हणाले की, महानगरपालिकेच्या दंडाच्या पावत्या या केवळ दंड आकारल्याच्या नोंदी असतात; त्या अतिक्रमण करण्यास परवानगी देत नाहीत. त्यामुळे पावत्या दाखवून कारवाई टाळता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विरोधाला न जुमानता कारवाई करण्यात आली.

जोडबसवण्णा चौक ते जमखंडी पूल दरम्यान असलेल्या जुन्या कार खरेदी-विक्री कार्यालयाचे अतिक्रमणही हटवून कार्यालय निष्कासित करण्यात आले. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

कारवाईदरम्यान काही ठिकाणी व्यापारी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur