Dailyhunt
लहानपणीच मुलांवर योग्य धार्मिकसंस्कार केले तर भविष्यात निश्चितच संस्कारक्षम पिढी घडेल - प्रसाद महाराज बडवे

लहानपणीच मुलांवर योग्य धार्मिकसंस्कार केले तर भविष्यात निश्चितच संस्कारक्षम पिढी घडेल - प्रसाद महाराज बडवे

हानपणीच मुलांवर योग्य धार्मिकसंस्कार केले तर भविष्यात निश्चितच संस्कारक्षम पिढी घडेल - प्रसाद महाराज बडवे

पंढरपूर - येथील पेशवा युवा मंचच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी रविवारी (दि.३) सामुदायिक व्रतबंध सोहळा संपन्न झाला.

यावेळी सोळा बटूंनीया सोहळ्यात सहभाग घेतला होता. येथील पद्मशाली धर्मशाळा येथे आयोजिलेला हा व्रतबंध सोहळा मोठ्या उत्साहात आणि शाही पध्दतीने पार पडला.

या व्रतबंध सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसाद महाराज बडवे होते. याप्रसंगी श्रीमंत पेशवे यांचेवंशज सौ व श्री पुष्कर पेशवा,इंदापूर येथील उद्योजक उदय देशपांडे,यावली येथीलआनंद आश्रम आनंदवाडी सेवकराम गुरुजी यांचे चिरींजीव वेदमूर्ती तोषश्री कुलकर्णी,पुणे येथीलइंडिया इंडस्ट्रीयालिस्टचे उद्योजक प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणूनउपस्थित होते.

अशा प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करणे ही काळाची गरज आहे. पेशवा युवा मंचाच्या विविध समाज उपयोगी कार्यक्रमा पैकी हा एक स्तुत्य उपक्रम आहे असे गौरवोदगार यावेळी मान्यवरांनी व्य्क्त केले.

मुंजीचे पौरोहित्य आकाश पारनेरकर गुरुजी व श्री विठ्ठलरुक्मिणी वेदपाठशाळाच्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी बटूंना शुभ आशीर्वाद देण्यासाठी सौ व प्रमोद देशपांडे, वैभव बडवे वीरेंद्रसिंह उत्पात, मानस कमलापूरकर, ॲड. इंद्रजीत परिचारक, तसेच वे.मू. चेतन पाटील, स्वानंद कुलकर्णी व डॉ.श्रीराज काणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान सायंकाळी शहरातील प्रदक्षिणा मार्गावरून बटूंची वाजत गाजत भव्य शोभायात्राकाढण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष निलेश कवडे व उपाध्यक्षआदित्य (राम) काळे आदींसह पेशवा युवा मंचच्या महिला भगिनी पदाधिकारी व सर्व पदाधिकारी सदस्यांनी परिश्रम घेतले.

------

विशेष म्हणजे या व्रतबंध सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक बटूस पेशवा युवा मंचतर्फे सोवळे, उपरणे, तांब्याचे पळी, पेला, ताम्हण तसेच संध्येची पोथी भेट देण्यात आली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur