Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
माचणूर-रहाटेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने दुरुस्तीची होतेय मागणी

माचणूर-रहाटेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने दुरुस्तीची होतेय मागणी

माचणूर-रहाटेवाडी रस्त्याची दुरावस्था झाल्याने दुरुस्तीची होतेय मागणी

मंगळवेढा - माचणूर ते रहाटेवाडी हा डांबरी रस्ता पुर्णत: उखडला असून संपूर्ण खडी वर आल्याने मोटर सायकल स्वार व पादचारी यांना येणे जाणे मुश्किल बनले असून अधिकार्‍यांचे या रस्त्याकडे लक्ष आहे की नाही?

असा आक्रोश करीत संताप व्यक्त केला जात आहे.

माचणूर ते रहाटेवाडी हे 8 कि.मी. अंतर असून हा रस्ता डांबरी रस्ता आहे. सध्या या रस्त्याची खडी संपूर्ण पृष्ठभागावर आली असून रस्ता जागेवर नसल्याचे विदारक चित्र आहे. अवजड वाहने येणे जाण्यामुळे अधिकच खडी वरती आल्याने मोटर सायकल स्वार व पायी चालत जाणार्‍यांना याचा नाहक सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक महिन्यापासून रस्त्याची ही वस्तुस्थिती असताना या रस्त्याकडे अधिकार्‍यांचे लक्ष आहे की नाही? असा संतापजनक सवाल या परिसरातील नागरिकामधून विचारला जात आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तात्काळ रस्ता दुरुस्त होेणे अपेक्षित आहे. भविष्यात पावसाळा सुरु होणार असल्यामुळे तो करणे अशक्य बनणार आहे. त्यामुळे तात्काळ अधिकार्‍यांनी या रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागणी होत आहे. दरम्यान तालुक्यामधील अनेक रस्त्यांची खूपच सोचनीय अवस्था बनली असून याकडे कोणाचेही लक्ष नसल्यामुळे हे रस्ते दुरुस्त कधी होणार? याबाबत प्रश्नांचा भडीमार होत आहे.

सोलापूर-मंगळवेढा राष्ट्रीय महामार्ग सोडला तर ग्रामीण भागातील तालुक्याला जोडणारे रस्ते पुर्णत: खराब झाले आहेत. याचीही दुुरुस्ती होेणे तितकेच महत्वाच्या असल्याच्या प्रतिक्रीया नागरिकामधून व्यक्त होत आहेत.

फोटो ओळी : माचणूर-रहाटेवाडी रस्त्याची झालेली दुरावस्था छायाचित्रात दिसत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur