Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

मंगळवेढा - पंढरपूर येथे धनश्री,सिताराम व आष्टी परिवाराच्या वतीने धनश्री प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार दि.30 एप्रिल ते सोमवार दि.4 मे रोजी सायं.

6 ते 8 या वेळेत आरती मंडप मनमाडकर, एलआयसी ऑफिस समोर, पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनश्री परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे यांनी दिली.

या प्रवचनमालेत श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री संत माणकोजी बोधले महाराज यांचे वंशज ह.भ.प.डॉ.श्रीगुरु जयवंत महाराज बोधले (धामणगावकर) हे सखा माझा ज्ञानेेशर या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. संत हे आपल्या जीवनातील संस्काराचे, सात्त्विकेतचे, समन्वयाचे प्रतीक आहेत. मनाच्या मशागतीसाठी आणि धैर्यप्राप्तीसाठी संतांनी आपले विचारधन दिले. हा संतविचार आपला जीवनमार्ग झाला की जगणे सुसह्य आणि आनंदाचे होते. हाच संत विचारांचा श्रवणीय ठेवा अनुभवण्याचा योग माऊली संत ज्ञानेेशर महाराज यांच्या 750 व्या जन्मोत्सवानिमित्ताने येत आहे.

सखा माझा ज्ञानेेशर या विषयावर संत माणकोजी महाराज बोधले यांचे वंशज ह. भ. प. डॉ. श्रीगुरू जयवंत महाराज बोधले (धामणगावकर) यांच्या सुश्राव्य वाणीतून 5 दिवस प्रवचने ऐकण्याचा योग धनश्री परिवाराने घडवून आणलेला आहे. मानवाने आपल्या जीवनात संतांचे विचार अंगीकारावेत, त्यांचे साहित्य व अभंग मनापासून श्रवण करावे आणि त्यातून आत्मविकास साधावा, ही या कार्यक्रमामागची प्रेरणा आहे. तात्त्विक विचारांपासून ते जीवनाच्या सहज वास्तवाशी जोडणार्‍या या प्रवचनातून प्रत्येकाला नवी दिशा मिळणार आहे.

तरी सर्वांनी या प्रवचनमालेचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक धनश्री सिताराम व आष्टी परिवाराच्या ंवतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur