Dailyhunt
पीडित चिमूरडीला न्याय मिळावा; भर चौकात जाळला पुतळा

पीडित चिमूरडीला न्याय मिळावा; भर चौकात जाळला पुतळा

पीडित चिमूरडीला न्याय मिळावा; भर चौकात जाळला पुतळा

सोलापूर - पुणे येथील नरसापुर या गावी झालेल्या चिमुरडीवर अत्याचाराच्या निषेधार्य संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकात गुन्हेगार आरोपी भीमा कांबळे यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळून आंदोलन करण्यात आले.

महाराष्ट्रात वारंवार महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत मुख्यमंत्री गृहमंत्री हे निष्क्रिय झाले असून गृहमंत्री पदाचा स्वतंत्र पदभार राज्य शासनाने निर्माण करावा महिला वरील अत्याचारासंदर्भात जलद न्यायालयाची स्थापना करण्यात यावी महाराष्ट्र शासनाने तात्काळ अधिवेशन बोलावून महिलां अत्याचार संदर्भात स्वतंत्र कायदा करण्यात यावा बलात्काराला भर चौकात तात्काळ फाशी देण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल दास, मनीषा कोळी, संजीवनी सलबत्ते, सोनाली सगर, सरोजिनी माकाई, अनिता वाघमारे, जयश्री रानसरजे, संतोष सुरवसे, विक्रम वानकर, शेखर भोसले, दत्तात्रय डिंगणे, कृष्णा पवार आदी उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur