Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

सोलापूर : नई जिंदगी परिसरातील कस्तुरबा नगर येथे रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. प्लास्टिकच्या गोडाऊनला लागलेल्या या आगीत संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे.

पहाटेच्या सुमारास अचानक गोडाऊनमधून धूर व ज्वाळा निघताना दिसू लागला. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आग वेगाने पसरत असल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशामक दलाच्या सात ते आठ पाण्याच्या बंबांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

प्लास्टिक साहित्य असल्यामुळे आगीने अल्पावधीतच भीषण रूप धारण केले. त्यामुळे आगीची तीव्रता अधिक वाढली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस व संबंधित यंत्रणा याबाबत तपास घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur