सोलापूर - संभाजी ब्रिगेड सामाजिक संघटनेची नूतन पदाधिकारी बैठक शासकीय विश्रामगृह मध्ये पार पडली. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांच्या सूचनेनुसार शहराध्यक्षपदी वैभव गायकवाड यांची निवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी राजे भोसले यांच्या हस्ते व संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आले.
संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षपदी प्रथमच कैकाडी समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. या निवडीनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्ती पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष श्रीकांत भोसले, शहर कार्याध्यक्ष शुभम काजळे, शहर संघटक सौरभ जन्मा, शहर सचिव अक्षय कांबळे, शहर प्रसिद्धी प्रमुख शाहिद पटेल, शहर सचिव कुमार गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मीनल दास, सुनीता घंटे, मनीषा कोळी, माधुरी चव्हाण, महेश आठवले, राजा गाय गवळी आदी उपस्थित होते.

