Dailyhunt
सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला विद्यामंदिरमध्ये वासंतिक वर्गाचे उद्घाटन

सांगोला - सांगोला विद्यामंदिर प्रशाला येथे नव्याने ५ वीमध्ये दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वासंतिक वर्गाचे उत्साहात उद्घाटन झाले.

यावेळी गुरुवर्य कै.बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास पालक व विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य बिभीषण माने, उपमुख्याध्यापक चारुदत्त जगताप, उपप्राचार्य प्रकाश म्हमाणे, पर्यवेक्षक काकासो नरुटे, प्रदीप धुकटे उपस्थित होते.

विद्यार्थ्यांचे स्वागत बिस्किटे वाटून करण्यात आले. बलून्स डेकोरेशन व सेल्फी पॉईंटमुळे विद्यार्थी आनंदीत झाले. प्राचार्य बिभीषण माने यांनी शाळेवर विश्वास बाळगत प्रवेशित झाल्याबद्दल पालकांचे आभार मानले. पालकांमधून महादेव घोंगडे, अमृता येलपले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र होनराव, सूत्रसंचालन वैभव कोठावळे यांनी केले.

आभार काकासो नरुटे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रशाला व ज्यु.कॉलेजचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur