Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सेवासदन प्रशालेची विविध वयोगटांमध्ये सुवर्ण कामगिरी

सेवासदन प्रशालेची विविध वयोगटांमध्ये सुवर्ण कामगिरी

सेवासदन प्रशालेची विविध वयोगटांमध्ये सुवर्ण कामगिरी

सोलापूर - कल्याण, मुंबई येथे झालेल्या राज्य शालेय गतका क्रीडा स्पर्धेत सु. रा. मुलींची सेवासदन प्रशालेच्या विद्यार्थिनींनी विविध वयोगटांमध्ये सुवर्ण कामगिरी केली.

१७ वर्षांखालील मुलींच्या फरीसोटी वैयक्तिक प्रकारात गिरीजा भोसले हिने आणि फरीसोटी सांघिक प्रकारात गिरीजा भोसले, श्रेया पाटील, तृप्ती अलदर व वैष्णवी डोळे यांनी सुवर्ण पदक पटकाविले.

सिंगल सोटी वैयक्तिक प्रकारात अक्षरा जाधव हिने आणि सिंगल सोटी संगीत प्रकारात कीर्ती शिंदे, ज्ञानेश्वरी मोरे, आर्या कोळसे व वैष्णवी स्वामी यांनीही सुवर्णपदकांची कमाई केली. या खेळाडूंना क्रीडा प्रमुख ज्ञानेश्वर काळे तसेच स्वाती मॅगेरी व शिल्पा चन्ना यांचे मार्गदर्शन लाभले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur