Dailyhunt
सोलापूरच्या रणरागिणींचा 'रिक्रिएशन'वर दिमाखदार विजय; भक्ती पवारची फिरकी व आर्याची फटकेबाजी

सोलापूरच्या रणरागिणींचा 'रिक्रिएशन'वर दिमाखदार विजय; भक्ती पवारची फिरकी व आर्याची फटकेबाजी

सोलापूरच्या रणरागिणींचा 'रिक्रिएशन'वर दिमाखदार विजय; भक्ती पवारची फिरकी व आर्याची फटकेबाजी

सोलापूर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूरच्या महिला संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर 'रिक्रिएशन' संघाचा १६ धावांनी पराभव करत शानदार विजय मिळवला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना सोलापूर संघाने निर्धारित २० षटकांत ५ बाद १२४ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य उभे केले. सोलापूरकडून आर्या उमाप हिने ३८ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ३५ धावांची खेळी करत संघाला भक्कम धावसंख्या उभारून दिली.

​प्रत्युत्तरादाखल खेळताना 'रिक्रिएशन' संघाला सोलापूरच्या अचूक गोलंदाजीसमोर २० षटकांत ४ बाद १०८ धावांपर्यंतच मजल मारता आली. रिक्रिएशनकडून संजना शिंदे (३५ धावा) आणि सयी वाळुंज (३० धावा) यांनी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढत्या धावगतीमुळे त्यांना अपयश आले. सोलापूरच्या विजयात गोलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली, ज्यामध्ये भक्ती पवार हिने ४ षटकांत केवळ १९ धावा देत २ महत्त्वपूर्ण बळी मिळवले. तिला साक्षी लामकाने हिने १ बळी घेत चांगली साथ दिली.

​उत्कृष्ट गोलंदाजीसाठी भक्ती पवार हिला 'सामनावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले.

--

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur