Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूर : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौरपदी बिनविरोध निवड झालेले विनायक कोंड्याल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासाठी महापौर कोंड्याल यांना शुभेच्छा दिल्या.

सोलापूर शहराच्या राजकारणात महत्त्वाची नोंद ठरलेल्या घडामोडीत, महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून विजयी ठरलेले आणि महापौरपदी बिनविरोध निवड झालेले विनायक कोंड्याल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोंड्याल यांच्या नेतृत्वगुणांचे आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीचे कौतुक केले.या सन्मानामुळे सोलापूरच्या विकासासाठी बळ मिळाल्याचे मानले जात आहे. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख यांच्यासह महापालिका पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

महापौरपदी बिनविरोध निवड होणे ही केवळ राजकीय कामगिरी नसून जनतेचा विश्वास आहे.

सोलापूर हे ऐतिहासिक आणि औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे शहर असून शहराच्या विकासासाठी सर्वांचे सहकार्य घेऊन पारदर्शक आणि गतीमान कारभार करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 1378 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा महाप्रकल्पास मंजुरी दिली. याबद्दल महापौर विनायक कोंड्याल यांनी आभार मानले. महापौर म्हणून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून

पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधा यावर विशेष भर देण्याचा विश्वास महापौर विनायक कोंड्याल यांनी व्यक्त केला.

स्थानिक पातळीवर सातत्याने विकासकामे राबवणे, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवणे आणि सर्वसामान्यांशी थेट संवाद ठेवणे ही महापौर कोंड्याल यांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली राहिली आहे. याच कामाच्या जोरावर त्यांनी सोलापूरकरांचा विश्वास जिंकत विक्रमी मतांनी विजय संपादन केला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur