Dailyhunt
स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन

पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये येत्या शनिवार, दि.

०२ मे २०२६ रोजी सकाळी ०९.३० वाजता विख्यात अणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरी (ए.सी.आय.सी.-स्वेरी) चे उदघाटन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे हे राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील, विधानपरिषदेचे माजी सदस्य प्रशांत परिचारक, मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार राजू खरे आणि सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) अतुल कुलकर्णी, सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पंढरपूर विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत डगळे, पंढरपूरचे उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, पंढरपूरचे तहसीलदार सचिन लंगोटे, पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक तय्यब मुजावर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे, पंढरपूरच्या पोलीस निरीक्षक सौ. रेखा घनवट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यापूर्वी दि. ०९ डिसेंबर २०२५ रोजी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटरच्या स्थापनेसाठी नीती आयोगाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला होता. हे केंद्र हे विशेषतः ग्रामीण भागातील उद्योजकता आणि रोजगार निर्मिती साठी प्रोत्साहन देण्याचे कार्य करणार आहे. स्वेरीचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत सचिव डॉ. सुरज रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोबस इनसाइट फोरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिग्विजय चौधरी व अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर- स्वेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भूतडा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur