Dailyhunt
टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रास उपविजेतेपदसंघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णीचा समावेश

टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रास उपविजेतेपदसंघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णीचा समावेश

टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्रास उपविजेतेपदसंघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णीचा समावेश

सोलापूर - पुणे बालेवाडी येथे झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राने 50 वर्षांवरील गटात उपविजेतेपद संपादिले.

अंतिम सामन्यात महाराष्ट्राला गुजरातकडून कडव्या लढतीनंतर 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.

या संघात सोलापूरच्या मनीष रावत व अनंत कुलकर्णी यांच्याबरोबरच मुंबईच्या ग्रोवर शरद, नचिकेत देशपांडे व अमित श्रॉफ यांचा समावेश होता. यांनी गुजरातबरोबरत कडवी झुंज दिली. परंतु गुजरातने बहारदार खेळी करीत विजेतेपद खेचून आणले.

महाराष्ट्र संघाच्या या यशाबद्दल सोलापूर जिल्हा टेबल टेनिस संघटनेचे अध्यक्ष डॉ. राजीव प्रधान, डॉ. नितीन तोष्णीवाल व झेड. एम. पुणेकर यांनी अभिनंदन केले

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur