Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
उन्हाच्या तीव्र तडाख्याने हैराण लोकांची जलतरण तलावावडे धाव

उन्हाच्या तीव्र तडाख्याने हैराण लोकांची जलतरण तलावावडे धाव

न्हाच्या तीव्र तडाख्याने हैराण लोकांची जलतरण तलावावडे धाव

पंढरपूर - शहरात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच असून नागरिक उन्हाच्या काहिलीत भाजून निघत आहेत, हैराण झाले असून, पारा ४० अंशांकडे सरकल्याने शहरात उष्णतेची लाट जाणवत आहे.

अशातच दुपारच्या वेळी रस्ते ओस पडत असले, तरी थंडावा मिळविण्यासाठी नागरिक, लहान मुले ,व्यायामाची आणि उत्तम आरोग्याची आवड असलेले युवक जलतरण तलावांवर गर्दी करत आहेत.

पंढरपूर येथे २०१० साली अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त मिनी ऑलिम्पिक धर्तीवर नगरपालिकेच्या वतीने स्विमिंग टँक सुरू करण्यात आला आहे.

विरंगुळा, आरोग्य या दोन्ही उद्देशांनी सध्या जलतरण तलाव हाउसफुल्ल असल्याचे चित्र शहरात दिसत आहे.

वर्षभर दिवसाला ५०-६० जणांचा वावर असलेल्या तलावांत आता हीच संख्या १०० ते १०५ पर्यंत पोहोचली आहे. नियमित सदस्यांसोबत 'समर स्पेशल' बॅचेसमुळे तलाव दिवसभर गजबजलेले दिसत आहे त्यात लहान मुलांचा सहभागही आहे. या ठिकाणी अडीच ते तीन वर्षांच्या बालकांसाठी स्वतंत्र बेबी पूलची सुविधा आहे.

महिलांसाठी स्वतंत्र वेळा, सुरक्षित वातावरणामुळे त्यांचाही सहभाग वाढला आहे. प्रत्येक बॅचमध्ये प्रशिक्षित लाइफगार्ड, सीसीटीव्ही देखरेख, तसेच आपत्कालीन वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पोहण्यासाठी मासिक शुल्क बाराशे रुपयां दरम्यान असून, ज्यांना पोहता येत नाही त्यांना खास कोचिंग क्लास सुरू करण्यात आला असून दोन हजार रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. येथे उन्हाळी सवलतीही देत आहेत.

सकाळी ६ पासून दुपारी १२ पर्यंत आणि दुपारी ३ ते रात्री ७ या वेळेत सुमारे १० ते ११ बॅचेस घेतल्या जातात.पाण्याची पातळी, स्वच्छता आणि पीएच स्तर दररोज तपासला जातो. नागरिकांच्या वाढत्या संख्येमुळे लाइफ सेव्हरची संख्या वाढविली आहे.

उन्हाळा सुरू होताच नगरपालिकेने शहरातील एकमेव जलतरण तलावाची सखोल पाहणी केली. प्रत्येक तलावावर आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत, याची खात्री केली असून, सुरक्षिततेसाठी विशेष मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी जीवरक्षक उपलब्ध आहेत का, याचीही तपासणी केली. याशिवाय तलावाची सर्व सुरक्षिततेच्या दृष्टीने बाबी तपासण्यात आल्या आहेत.

--

पोहणे हा सर्वांत सुंदर आणि परिपूर्ण असा व्यायाम आहे, आम्ही परदेशी स्विमिंग अकादमी तर्फे गेल्या दोन वर्षांपासून हा स्विमिंग पूल चालविण्यास घेतला असून

पोहायला येणाऱ्या मुलांची विशेष काळजी घेतली जात आहे,याठिकाणी बेबी पूल आणि जनरल असे दोन विभाग असून नवीन पोहायला शिकणाऱ्या युवक, लहान मुले व महिलांसाठी विशेष प्रशिक्षणाची सोय आहे,आमच्या अकादमी तर्फे अनेक मुले पोहण्याच्या विविध स्पर्धेत यशस्वी झाली आहेत.

सत्यजीत परदेशी.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur