Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वालचंदची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम

वालचंदची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम

वालचंदची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम

सोलापूर : फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या एचएससी (इयत्ता 12वी) बोर्ड परीक्षेत वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स महाविद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे.

महाविद्यालयाचा एकूण निकाल अत्यंत समाधानकारक लागला असून, विज्ञान शाखेचा 98.61 टक्के तर कला शाखेचा 80.29 टक्के निकाल नोंदविण्यात आला आहे.

विज्ञान शाखेतील गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आहेत :
प्रथम क्रमांक - अनिकेत लक्ष्मण खडके (92.83%)
द्वितीय क्रमांक - हसिनी संतोष शेगुरे (89.50%)
तृतीय क्रमांक - नितीन किशोर कोंकाटी (86.67%)

कला शाखेतील गुणवंत विद्यार्थी :
प्रथम क्रमांक - संचिता सचिन ढंगे (90%)
द्वितीय क्रमांक - अनुष्का किशोर रच्चा (89.67%)
तृतीय क्रमांक - रोशनी सुरेश श्रीराम (88.33%)

विशेष म्हणजे विज्ञान शाखेतील गणित विषयात 2 विद्यार्थ्यांनी, तर कला शाखेतील अर्धमागधी विषयात 7 विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी व पालकांनी महाविद्यालयात राबविण्यात येणाऱ्या विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांचे कौतुक केले. मंथली टेस्ट, विषयनिहाय विशेष मार्गदर्शन, समुपदेशन सत्र, ओपन हाऊस, परीक्षा तणावमुक्ती उपक्रम, निरामय आरोग्य कार्यशाळा तसेच करिअर मार्गदर्शन सत्र यांचा विद्यार्थ्यांच्या यशात मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमास उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे, स्वयंअर्थसहाय्य विभाग प्रमुख सौ. सारिका महिंद्रकर, सर्व शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Tarun Bharat Solapur