वर्क फ्रॉम व्हिलेज' च्या माध्यमातून ग्रामीण भारताचे आर्थिक सबलीकरण शक्य - पद्मविभूषण डॉ. काकोडकर
पंढरपूर - 'संकल्पने पासून ते शेवटच्या ग्राहकापर्यंत एखादी गोष्ट पोहोचवण्याचाप्रवास म्हणजेच इनोव्हेशन होय.औद्योगिक युगात 'शहराकडे चला' अशी मानसिकता निर्माण झाली होती, मात्र आजच्या ज्ञानयुगात 'डिजिटल तंत्रज्ञाना'मुळे 'वर्क फ्रॉम होम' प्रमाणेच 'वर्क फ्रॉम व्हिलेज' ही संकल्पना प्रत्यक्षात साकारतायेणे शक्य आहे.
ग्रामीण भागातील तरुणांना शहराप्रमाणे साधने उपलब्ध करून दिल्यासदेशाची आर्थिक विषमता कमी होऊन खऱ्या अर्थाने प्रगती साधता येणे शक्य आहे. इनोव्हेशन पुढे नेण्यासाठी पूरकवातावरण निर्मिती करणे आवश्यक असून शहरापेक्षा ग्रामीण भागात इनोव्हेशन इकोसिस्टमनिर्माण करणे अवघड आहे. पण, हे करणे महत्वाचे आहे. यामुळे एसीआयसीच्या माध्यमातूनग्रामीण भागाचे शिक्षणाद्वारे सबलीकरण होईल.' असे प्रतिपादन विख्यातअणुशास्त्रज्ञ तथा भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
येथील स्वेरी महाविद्यालया मध्ये आयोजिलेल्या 'अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर या केंद्राच्या उदघाटन प्रसंगी पद्मविभूषण डॉ. काकोडकर हेउपस्थितांना मार्गदर्शन करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंढरपूर-मंगळवेढाविधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे हे होते.
या वेळी एसीआयसीचे सल्लागार व सोबस इन्साईट फोरमचे संस्थापक दिग्विजय चौधरी, एसीआयसी स्वेरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष भुतडा, सल्लागार रेशा पटेल आदींनी मार्गदर्शन केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना आमदारसमाधान आवताडे म्हणाले की, 'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीसंशोधन क्षेत्रात विशेष निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून संशोधन झालेपाहिजे यासाठी नाविन्यपूर्ण विचार पुढे येण्याची गरज आहे. कमी वेळेत उत्कृष्ठदर्जाचे उत्पादन झाल्यास निश्चितपणे स्वप्नातील भारत अवतरणार आहे. भारताच्या जडणघडणीत शास्त्रज्ञ डॉ.काकोडकर यांचा मोलाचा वाटा आहे. जर देशाची पाच ट्रीलीयनडॉलर इकॉनॉमी करायची असेल तर नवनवीन तंत्रज्ञान, प्रयोगांची निर्मिती, संशोधन झाले पाहिजे. संशोधन केंद्र, बचत गट, याद्वारे उद्योजक तयार व्हावेत. एकूणच एसीआयसी - स्वेरी या केंद्राच्या माध्यमातून झालेल्या संशोधनातून एका नालंदा विद्यापीठाच्या प्रतिकृती निर्मिती करणे ही आहे. या केंद्रामुळे ग्रामीण भागातील तरुणांमध्ये असलेल्या कल्पकतेला मोठी चालना मिळणार आहे. हे मात्र नक्की ! म्हणून तुम्ही केंद्राच्या माध्यमातून कार्य करत रहा, आवश्यक असेल त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाच्या माध्यमातूनपाठपुरावा करू.' असे आश्वासनआवताडे यांनी दिले.
यावेळी स्वेरीचे सर्वेसर्वा डाँ.बी.पी.रोंगे, सौ.सुयशा काकोडकर, डॉ. जान्हवी गांगल, तन्मय मुखर्जी, अनघा पाठक, महेश पाठक, शरद भोसले, स्वप्नील कांबळे, आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. माधव पोळ, कामगार आयुक्त दत्ता पवार, पांडुरंग साखर कारखान्याचे संचालक दिलीप गुरव, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वंदना बीडकर, अनिता पवार, विलास मस्के, आर्किटेक्ट यादगिरी कोंडा, शेतकरी, महिला बचत गटातील महिला वर्ग, प्रशासकीय व सामाजिक क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी, स्वेरीचे अध्यक्ष अशोक भोसले, उपाध्यक्ष सुरेश राऊत, सचिव डॉ.सुरज रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त प्रा.सी.बी.नाडगौडा, धनंजय सालविठ्ठल, विश्वस्त एन.एम. पाटील, विश्वस्त एच. एम.बागल,विश्वस्तबी.डी.रोंगे, स्वेरी अंतर्गत असलेल्या पाचही महाविद्यालयांचे प्राचार्य, उपप्राचार्या, अधिष्ठाता, विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या केंद्रासाठी डॉ.हर्षवर्धन रोंगेहे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. सूत्रसंचालन डॉ.नीता तळवलकर यांनी केले तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांनी आभार मानले.
------
केंद्र हे भविष्यात अनुकरणीय माँडेल बनेल
डॉ.काकोडकर म्हणाले की, 'इनोव्हेशनची सुरुवात ही तळागाळातील माणसांच्या गरजांमधून होते. भारताची मोठी लोकसंख्या असून ग्रामीण भागातील तरुणाई हीच आपली सर्वात मोठी जमेची बाजू आहे. युवकांच्या माध्यमातून नवनवीन संकल्पना प्रत्यक्षात साकार करता येतील. यातून केवळ शहरांचे उदात्तीकरण करण्यापेक्षा ग्रामीण भागातच उत्पादनाची साधने विकसित करणे ही काळाची गरज आहे. पंढरपूर मध्ये औद्योगिक वसाहत निर्माण झाल्यास येथील विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पंढरपूर सारख्या ग्रामीण भागाचा विकास झपाट्याने होईल. ज्या ठिकाणी आर्थिक विषमता कमी होते तेथील विकास झपाट्यानेहोतो. एकूणच स्वेरीतील एसीआयसी केंद्र भविष्यात अनुकरणीय मॉडेल बनेल.' असा विश्वास डॉ. काकोडकर यांनी व्यक्त केला.

