Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कोल्हापूर, वसईसाठी काय केली सरकारने घोषणा?

कोल्हापूर, वसईसाठी काय केली सरकारने घोषणा?

Nitesh Rane

मुंबई (Mumbai): वसई (जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावा असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिले.

तसेच कोल्हापूर शहरातील राजोपाध्येनगर येथे होणाऱ्या नियोजित फिश मार्केटला आवश्यक मदत व निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.

Chakan Traffic: चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न आता सुटणार; कारण...

वसई (जि. पालघर) येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी आवश्यक जागा मागणीचा प्रस्ताव महसूल विभागाकडे पाठवावा असे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे याविषयी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. बैठकीस आमदार स्नेहा दुबे, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार आदी उपस्थित होते.

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील यासाठी प्रकल्पाची अंमलबजावणी लवकर होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजना ही महत्त्वाची योजना असून या योजनेच्या जनजागृतीसाठी शिबिरांचे आयोजन करून जास्तीत जास्त लाभार्थी पर्यंत ही योजना पोहचवावी, असे निर्देशही राणे यांनी दिले.

Shambhuraj Desai: मयूर नगर SRA प्रकल्पाबाबत 15 दिवसांत अहवाल

मत्स्यव्यवसाय मंत्री राणे पुढे म्हणाले, कोल्हापूर येथील नियोजित फिश मार्केट दर्जेदार व्हावे यासाठी जिल्हा नियोजनमधूनही निधी उपलब्ध करुन घ्यावा. या मार्केटसाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडील अन्य योजनांचाही लाभ मिळवून दिला जाईल.

प्रस्तावित मार्केटमध्ये स्वच्छता, कोल्ड स्टोरेज, पिण्याचे पाणी, सांडपाणी व्यवस्थापन आणि ग्राहकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रकल्पामुळे स्थानिक विक्रेत्यांना नियोजित बाजारपेठ मिळणार असून ग्राहकांनाही दर्जेदार सेवा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी आमदार अमल महाडिक, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गिरगाव चौपाटी येथे मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या समस्यांसंदर्भात बैठक झाली. कोळी बांधवांच्या समस्यांचा सकारात्मक विचार करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगत पारंपरिक मच्छीमाराला मदत करण्याची शासनाची भूमिका असल्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राणे यांनी सांगितले. तसेच मुरुड-जंजिरा नगरपरिषद हद्दीत कोळी समाजाच्या विविध मागण्या संदर्भातही यावेळी चर्चा करण्यात आली. या बैठकीस पर्यटन विभागाचे सचिव संजय खंदारे उपस्थित होते.

शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाबाबत सरकारने काय घेतला मोठा निर्णय?

या बैठकीत मच्छी सुकविण्यासाठी जागा, जाळी व बोटी दुरुस्ती केंद्रे, कोळी खेड्यांचा विकास तसेच पर्यटनाला चालना देणारे प्रकल्प यावर चर्चा करण्यात आले. 'बॅक वॉटर' प्रकल्पाच्या माध्यमातून आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पर्यटन विभाग व मत्स्य व्यवसाय विभागाकडे प्रस्ताव सादर करावा. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांनी सर्व संबंधितांची बैठक घेण्याचे निर्देश राणे यांनी दिले.

मच्छीमार संस्थांना मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची माहिती देण्यात यावी. त्यासाठी शिबिरांचेही आयोजन करण्यात यावे असे निर्देशही मत्स्यव्यवसाय मंत्री राणे यांनी दिले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama