Dailyhunt
Mumbai : हाजी अली पंपिंग स्टेशनच्या मेंटेनन्ससाठी 278 कोटींचे टेंडर

Mumbai : हाजी अली पंपिंग स्टेशनच्या मेंटेनन्ससाठी 278 कोटींचे टेंडर

BMC Mumbai

मुंबई (Mumbai) : हाजी अली पर्जन्य जलवाहिनी पंपिंग स्टेशनच्या दैनंदिन देखभाल दुरुस्तीसाठी मुंबई महापालिकेने टेंडर प्रसिद्ध केले होते. या टेंडर प्रक्रियेत डब्ल्यूएमईएल-एएनसी जेव्ही या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

१५ वर्षाच्या कालावधीत या कामावर २७८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

Mumbai : पूर्व द्रुतगती महामार्गावरील 'त्या' चौकात हवे 2 नवे रस्ते, 4 फ्री लेफ्ट टर्न रस्ते

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाळी पाण्याचा जलदगतीने निचरा व्हावा यासाठी सहा पंपिंग स्टेशन बांधण्याचा आली आहेत. याअंतर्गत हाजी अली (महालक्ष्मी) पंपिंग स्टेशन २००९-१०मध्ये सुरु करण्यात आले. २०१८ पासून सात वर्षांच्या कालावधीसाठी म्हाळसा कस्ट्रक्शन या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. ही मुदत आता ३१ मे २०२५ ही रोजी संपुष्टात येत आहे. महापालिकेने पुढील १५ वर्षांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबवली होती. हाजी अली आणि इर्ला पंपिंग स्टेशनच्या (Irla Pumping Station) उपकरणांच्या वस्तुस्थिती जाणून घेऊन त्याची आयआयटी, मुंबईकडून खात्री करून घेण्यात आली. कोणकोणते उपकरण पूर्ण बदलणे गरजेचे आहे व कोणकोणते उपकरण फक्त दुरुस्त करणे गरजेचे आहे त्यानुसार टेंडर प्रसिद्ध करून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

Mumbai : 66 हजार कोटींचा 'तो' मेगा प्रोजेक्ट बीओटीवर राबवणार

महापालिकेने हाजी अली पंपिंग स्टेशनसाठी २००९मध्ये पंप खरेदी करून हे पंपिंग स्टेशन २०१०मध्ये कार्यान्वित केले होते. ९९ कोटी रुपये खर्च करून हे पंपिंग स्टेशन बनवण्यात आले होते, त्यात पुढील सात वर्षांच्या देखभालीचाही समावेश होता. त्यानंतर पुढील आठ वर्षांच्या देखभालीसाठी सुमारे ४४ कोटी रुपये खर्च करण्यात येत होते, परंतु आता येथील पंप खराब झाल्यामुळे तसेच त्यांचे आयुर्मान संपल्यामुळे हे पंप नव्याने बसवून त्यांची पुढील १५ वर्षांसाठी देखभाल करण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. केवळ देखभाल आण दुरुस्ती नव्हेतर यामध्ये नवीन पंप आणि इतर उपकरणे तसेच सिव्हील प्रकारची कामेही प्रस्तावित असल्याचे सांगण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama