Dailyhunt
मुंबईतील कामाठीपुऱ्याबाबत आली चांगली बातमी! लवकरच...

मुंबईतील कामाठीपुऱ्याबाबत आली चांगली बातमी! लवकरच...

Mhada

मुंबई (Mumbai): दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक व अत्यंत महत्त्वाकांक्षी 'कामाठीपुरा' परिसराच्या प्रत्यक्ष पुनर्विकासाला लवकरच सुरुवात होणार आहे.

BMC Tender: कुर्ला ते घाटकोपर दरम्यान बहुप्रतिक्षित उड्डाणपूल; निवडणुकीआधी टेंडर

म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने या पुनर्विकासासाठी आवश्यक असलेल्या 'कन्स्ट्रक्शन अँड डेव्हल्पमेन्ट एजन्सी' (C&D) अर्थात खासगी विकासकाच्या नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आणली आहे.

यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

कामाठीपुरा परिसराचा पुनर्विकास हा सुमारे ३४ एकर जागेवर प्रस्तावित आहे. येथील ४७५ उपकरप्राप्त इमारती, १६३ उपकरप्राप्त नसलेल्या इमारती तसेच अन्य प्रकारची बांधकामे जीर्ण झाली आहेत. या इमारतींच्या दुरवस्थेमुळे आणि पुनर्विकासासाठी कोणीही विकासक पुढे न आल्यामुळे दुरुस्ती मंडळाने स्वतः पुनर्विकासाची जबाबदारी स्वीकारली.

पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक 'या' 3 जिल्ह्यांसाठी गुड न्यूज! सरकारने काय घेतला निर्णय?

काही महिन्यांपूर्वी मंडळाने खासगी विकासकाच्या नियुक्तीसाठी निविदा मागविल्या होत्या. यानुसार, दोन कंपन्यांच्या निविदा सादर झाल्या असून, त्या अंतिम करण्याच्या कामाला वेग आला आहे. निविदा अंतिम झाल्यावर, संबंधित प्रस्ताव राज्य सरकारच्या अंतिम मान्यतेसाठी पाठविण्यात येईल.

राज्य सरकारची मान्यता मिळताच, घरे रिकामी करणे, घरभाडे देणे आणि भूखंड रिकामा करणे यांसारख्या कार्यवाहीला सुरुवात होईल, आणि त्यानंतर लगेचच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन आहे.

Simhastha Mahakumbh: पायाभूत कामांची मान्यता, टेंडर अन् वर्क ऑर्डर आता मिशन मोडवर

एका बाजूला विकासक नियुक्तीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना, दुसऱ्या बाजूला दुरुस्ती मंडळाने कामाठीपुरातील रहिवाशांच्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला गती दिली आहे. सध्या कोण वास्तव्यास आहे आणि अंतिमतः पात्र रहिवाशांची संख्या किती आहे, हे तपासण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे.

एका खासगी कंपनीच्या सहकार्याने हे बायोमेट्रिक सर्वेक्षण सुरू आहे. अंदाजे आठ हजार सदनिकांतील रहिवाशांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट मंडळाचे असून, आतापर्यंत सुमारे २५०० रहिवाशांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. उर्वरित सर्वेक्षण येत्या काही महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

१०० टक्के सर्वेक्षण पूर्ण होताच आणि निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन विकासकाची नियुक्ती झाल्यावर, पुनर्वसित इमारतींच्या बांधकामाला तातडीने सुरुवात केली जाईल, असे दुरुस्ती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. कामाठीपुरा परिसरातील ६०७३ निवासी आणि १३४२ अनिवासी रहिवाशांना यामुळे लवकरच मोठा दिलासा मिळणार आहे

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama