Dailyhunt
Nashik Airport: ओझर विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय दिली गुड न्यूज?

Nashik Airport: ओझर विमानतळाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय दिली गुड न्यूज?

Ozar airport nashik सध्या ओझर विमानतळावरून राजधानी नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर या शहरांसाठी विमान सेवा उपलब्ध

नाशिक (Nashik): येथील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Nashik: गिरणा पात्रातील 8 वाळू घाटांच्या लिलावासाठी तिसऱ्यांदा टेंडर; आतापर्यंत केवळ 2 घाटांचे लिलाव

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ओझर विमानतळ येथे हवाई दल व महाराष्ट्र सरकार मिळून ११०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून विमानतळाचे विस्तारीकरण व टर्मिनस उभारणी करीत आहे.

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, आमदार राहुल ढिकल, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि एचएएलचे संजय चौधरी यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले.

Nashik: निकृष्ट रस्तेकामाच्या विरोधात 2 अधिकारी अन् 2 कारवाया

फडणवीस म्हणाले की, आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त आठ ते दहापट भाविक येणार आहेत. त्यांना अधिक सुविधा देण्यासाठी विमानतळाचे विस्तारीकरण करण्यात येत आहेत. विस्तारीकरणामुळे प्रवाशी क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. कृषी क्षेत्रात नाशिक अग्रेसर जिल्हा असल्याने निर्यातीला तसेच औद्योगिकीकरणाला चालना मिळणार आहे. दावोस दौऱ्यात नाशिकसाठी १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती वाढणार आहेत.

नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यात 30 हजार कोटी रूपयांची विविध विकास कामे होणार आहेत. गोदावरी नदी निर्मल राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. नाशिकचा परिक्रमा मार्ग हा नाशिकचे ग्रोथ इंजिन ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Nashik: सिंहस्थाच्या तयारीला वेग! आत्तापर्यंत तब्बल 10 हजार 500 कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले की, विमानतळ विस्तारीकरणामुळे नाशिक जिल्ह्याचा २२ जिल्ह्यांशी थेट संपर्क होणार आहे. तसेच शेतमाल निर्यातीला चालना मिळणार आहे. विस्तारित विमानतळाची पर्यटन, निर्यातीत महत्वाची भूमिका राहील. विभागीय आयुक्त डॉ. गेडाम म्हणाले की, कार्गो वाहतुकीबाबत ओझर विमानतळ राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे विमानतळ ठरले आहे. कुंभमेळ्यानिमित्त २३ हजार कोटी रुपयांची विकास कामे सुरू असून आणखी चार हजार कोटी रुपयांची विकास कामे प्रस्तावित आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama