Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Nashik Airport Update: ओझर विमानतळ विस्तारीकरणाला दिल्लीतून ग्रीन सिग्नल; 1100 कोटींखर्चून...

Nashik Airport Update: ओझर विमानतळ विस्तारीकरणाला दिल्लीतून ग्रीन सिग्नल; 1100 कोटींखर्चून...

Ozar airport nashik सध्या ओझर विमानतळावरून राजधानी नवी दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, बंगळूर या शहरांसाठी विमान सेवा उपलब्ध

नाशिक (Nashik): नाशिक: सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या ओझर विमानतळाच्या (Ozar Airport) विस्तारीकरणाच्या अंतिम आराखड्याला नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा महासंचालकांनी (BCAS) मंजुरी दिली आहे.

यामुळे विमानतळाची प्रवासी क्षमता थेट तीन पटीने वाढवणाऱ्या ११०० कोटी रुपयांच्या महाकाय प्रकल्पाच्या बांधकामाला आता गती मिळणार आहे.

Nashik: सिंहस्थ कुंभमेळ्यातील हजारो कोटींची कामे आचारसंहितेच्या कचाट्यात

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचा आणि व्हीआयपींचा हवाई प्रवास सुकर करण्यासाठी नाशिकमधील ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. संरक्षण आणि नागरी उड्डाण या दोन्ही दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या विमानतळाच्या विस्तारीकरणाचा आराखडा सुरक्षा मंजुरीच्या प्रक्रियेत अडकला होता.

अखेर, नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा महासंचालकांकडून या आराखड्यास अधिकृत मंजुरी मिळाल्याचे पत्र ओझर विमानतळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे.

Nashik: वर्षभरापूर्वी 19 कोटी खर्च केलेल्या सुस्थितीतील द्वारकाचौक ते नाशिकरोड रस्त्यावर 177 कोटींचे डांबरीकरण

११०० कोटींची संयुक्त गुंतवणूक; राज्य सरकारकडून ५६० कोटी
भारतीय हवाई दल (IAF) आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त भागीदारीतून ओझर येथे ११०० कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली जात आहे. या प्रकल्पांतर्गत नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत (Integrated Terminal Building) उभारली जात आहे.

या कामाचे भूमिपूजन फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले होते. एकूण गुंतवणुकीपैकी महाराष्ट्र सरकारने ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, यामुळे विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता सध्याच्या तुलनेत तीन पटीने वाढणार आहे.

नवे ॲप्रॉन आणि टॅक्सी वे होणार सज्ज
सुरक्षा महासंचालकांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलेल्या आराखड्यात केवळ टर्मिनल इमारतच नव्हे, तर विमानांच्या सुकर संचालनासाठी महत्त्वाच्या तांत्रिक बाबींचा समावेश होता. त्यानुसार आता विमानतळावर नवीन ॲप्रॉनचे बांधकाम करणे, विद्यमान ॲप्रॉनचा विस्तार करणे आणि विमानांच्या हालचालींसाठी अद्ययावत 'टॅक्सी वे' (Taxiway) बांधण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे.

Nashik Ring Road: रिंगरोडबाबत एनएमआरडीएने काय घेतला निर्णय?

सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश
एरोड्रम सल्लागार समितीनेही या विस्तार कामाला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, हे काम सुरू असताना हवाई सुरक्षेला कोणताही धोका पोहोचू नये, यासाठी प्रमाणित कार्यपद्धतीचा (SOP) अवलंब करण्याचे कडक निर्देश देण्यात आले आहेत. धावपट्टी आणि विमानतळ परिसरातील कामाची दैनंदिन माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला (ATC) देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित (MIDA) मार्फत हे काम केले जात असून, कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मंजुरीमुळे नाशिकच्या पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणार असून, जिल्ह्याला जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

66 किमीचा बाह्य रिंगरोड ठरणार नाशिकची नवी Life Line! 16 गावांच्या NMRDA चा मास्टरप्लॅन; जमीन मालकांसाठी 3 मोठे पर्याय

Key Points Summary

  • ओझर विमानतळ विस्तारीकरण आराखड्यास नागरी विमान सुरक्षा महासंचालकांकडून मंजुरी.

  • हवाई दल आणि महाराष्ट्र शासनाची ११०० कोटी रुपयांची संयुक्त गुंतवणूक.

  • प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर.

  • नवीन टर्मिनल इमारतीसह नवे ॲप्रॉन आणि टॅक्सी वेचे काम होणार.

  • विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता थेट तीन पटीने वाढणार.

  • सिंहस्थ कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे कालबद्ध नियोजन.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama