Dailyhunt
Pune : डांबर घोटाळा प्रकरणी महापालिका कारवाई करणार का?

Pune : डांबर घोटाळा प्रकरणी महापालिका कारवाई करणार का?

PMC

पुणे (Pune) : पुणे महापालिकेकडून (PMC) डांबर खरेदी टेंडर (Tender) प्रकरणात नेमके काय मंजूर केले आहे, याबाबतची तपासणी केली जाईल. त्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात 5150 ई-बसेस येणार; मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

महापालिकेकडून रस्त्यांच्या कामांसाठी थेट पेट्रोलियम कंपन्यांकडून डांबर घेण्याऐवजी मागील तीन वर्षांपासून ठेकेदारांमार्फत डांबर खरेदी केले जात आहे. त्याद्वारे महापालिकेची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे. डांबर खरेदी टेंडर प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नीलेश निकम यांनी गुरुवारी केला होता.

Devendra Fadnavis : मुंबईतील चाळी, झोपडपट्ट्यांचा क्लस्टर पुनर्विकास; स्वयं पुनर्विकासाच्या प्रीमियमचे व्याज 3 वर्षे माफ

महापालिकेला डांबर मिळाले नसतानाही ठेकेदाराला पैसे देण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निकम यांनी केली होती.

याबाबत आयुक्त डॉ. भोसले म्हणाले की, संबंधित प्रकरणाची तपासणी केली जाईल. त्यात नेमके काय घडले आहे, याची माहिती पुढे येईल. त्यानंतर याप्रकरणात काय करायचे आहे, याचा निर्णय घेतला जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama