Dailyhunt
Pune Metro : मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी अवघ्या 3 रुपयांत मिळणार पर्याय

Pune Metro : मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी अवघ्या 3 रुपयांत मिळणार पर्याय

Pune

पिंपरी (Pimpri) : मेट्रो प्रवाशांसाठी 'लास्ट माइल कनेक्टिव्हिटी' उपक्रम पुणे शहरात सुरू करण्यात आला आहे. मेट्रो स्टेशनपर्यंत जाण्यासाठी भाडेतत्वावरील ई-स्कूटर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

असा उपक्रम शहरातील मेट्रो स्थानक परिसरात सुरू करण्याची मागणी पुढे आली आहे.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज; केंद्र सरकार काय देणार गिफ्ट?

महामेट्रो प्रशासनाने पुण्यातील आनंदनगर स्थानक ते एमआयटी विद्यापीठ मार्गावर प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम सुरू केला आहे. औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या तीस लाखांहून अधिक आहे. शहरात मोठ मोठ्या कंपन्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालये उपलब्ध आहेत. येथील कामगार आणि विद्यार्थी यांना या सुविधेचा लाभ उपलब्ध करून दिल्यास याचा मोठा फायदा होईल.

'जेनेसिस इलेक्ट्रिक मोबिलिटी' कंपनीतर्फे परवडणाऱ्या दरात ही सुविधा दिली जात आहे. शहरातील मेट्रो स्थानक परिसरात ई-स्कूटर उपक्रम सुरू केल्यास प्रदूषणात घट होईल. तसेच नागरिकांच्या पैशांची बचत होणार आहे.

धाराशिव, तुळजापूर, औसा तालुक्यांसाठी आनंदाची बातमी; निम्न तेरणाचे पहिले टेंडर जाहीर

अशी आहे बुकिंग प्रक्रिया

- ॲपद्वारे ई-स्कूटर बुक करता येइल.

- ई-मेल आणि आधार क्रमांकाच्या सहाय्याने ट्रॅकिंग करता येते.

- स्कुटरचे भाडे तीन रुपये प्रतिमिनिट आहे.

- अर्ध्या युनिट चार्जिंगमध्ये स्कूटर ३० कि.मी. प्रवास करते.

- बुकिंग आणि भाडे ऑनलाइन करता येते

'या' पुलामुळे पुणे ते शिरूर अंतर अवघ्या 80 मिनिटांत पार करता येणार

सायकलचा उपक्रम फसला

शहरात दोन वर्षांपूवी मेट्रो स्थानकाबाहेर सायकल ठेवण्यात आल्या होत्या. तिचा वापर प्रवाशांनी करावा. यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल, अशी या मागची संकल्पना होती. मात्र, त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ती सेवा बंद करण्यात आली आहे.

शहरातील दहा ठिकाणे नियोजित

पुणे महामेट्रो प्रशासनाने दहा मेट्रो स्थानकांची यादी केली आहे. ई-स्कूटर स्थानकासाठी सोयीच्या असणाऱ्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानकाचा समावेश आहे.

Mumbai : 'नैना' प्रकल्प क्षेत्रातील रस्ते, पूल, पाणीपुरवठा, मलनि:सारण योजनांसाठी टेंडर

पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो स्थानकांची पाहणी करून, लास्ट माइल कनेक्टिव्हिटी उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी नेमलेली कंपनी स्थानकांची पाहणी करून निर्णय घेणार आहे.

- डॉ. हेमंत सोनावणे, कार्यकारी संचालक, मेट्रो

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama