Dailyhunt
Pune : टेंडर प्रक्रियांचा कालावधी घटवला; काय होणार परिणाम?

Pune : टेंडर प्रक्रियांचा कालावधी घटवला; काय होणार परिणाम?

Mantralaya

पुणे (Pune) : विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी राज्य शासनाने आता टेंडर (Tender) प्रक्रियेचा कालावधी आता ८ ते २१ दिवसांवर आणला आहे.

Devendra Fadnavis : CM फडणवीस अ‍ॅक्शन मोडमध्ये; खरपुडी येथील 900 कोटींच्या 'त्या' प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत कामे अडकून पडू नयेत, यासाठी शासनाने टेंडर प्रक्रियांचा कालावधी १५ ते ४५ दिवसांचा केला होता.

नवा आदेश काढून हा कालावधी आता आणखी कमी करण्यात आला आहे.

Baramati : लेखापरिक्षण अहवालामुळे नगरपालिकेच्या कारभारावर प्रश्‍नचिन्ह

विविध विकासकामांना प्रशासकीय मान्यता घेणे, टेंडर प्रसिद्ध करणे, कार्यारंभ आदेश देणे, त्यानंतर प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात होते. यासाठी बराच कालावधी जातो. हे आर्थिक वर्ष संपण्यास सुमारे दीड महिन्याचा वेळ आहे.

त्यामुळे वेळेत निधी खर्च करण्यासाठी तसेच विकासकामे लवकर सुरू करण्याचे नियोजन शासनाने केले आहे. त्यामुळे टेंडरचा कालावधी कमी केला आहे. याबाबतचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव दीपाली घोरपडे यांनी काढले आहेत.

Mumbai : फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'त्या' प्रकल्पासाठी 1594 कोटींची मान्यता

असा असेल नवा कालावधी

(कामाची किंमत ............ कालावधी)

- १० लाख ते दीड कोटी ...... ८ दिवस

- दीड कोटी ते २५ कोटी ...... ८ दिवस

- २५ कोटी ते १०० कोटी ...... १५ दिवस

- शंभर कोटींपेक्षा जास्त ...... २१ दिवस

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: TenderNama