Thursday, 16 Sep, 11.20 am The Focus India

होम
आम्ही ट्विट आणि पोस्टरवर सरकार चालवीत नाही, राजस्थानच्या मंत्र्याचा टोला

वृत्तसंस्था

जयपूर : विकासाचे उदाहरण म्हणून राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार दुसऱ्या राज्यातील पुलाचे छायाचित्र दाखवीत नाही, अशा शब्दांत ऊर्जा मंत्री बुलाकीदास कल्ला यांनी भाजपची खिल्ली उडविली आहे. Rjsthan minister targets BJP

बुलाकीदास कल्ला यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपवर निशाना साधला. ते म्हणाले की, राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारचे काम प्रत्यक्ष दिसते. आम्ही ट्विट आणि पोस्टरवर सरकार चालवीत नाही. कोलकत्याचा उड्डाणपूल आम्ही लखनौमध्ये दाखवत नाही. आम्ही जनतेत गोंधळ निर्माण करीत नाही.उत्तर प्रदेश सरकारच्या जाहिरातीत कोलकत्यामधील उड्डाणपुलाचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यामुळे नुकताच राजकीय वाद झाला. या पार्श्वभूमीवर विधानसभेत राज्यातील विजेच्या स्थितीबाबत कल्ला यांनी हे विधान केले. वीजखरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधी उपनेते राजेंद्र राठोड यांनी केला होता.

कल्ला यांनी हा आरोप फेटाळून लावला. ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे कोळशाचे दर वाढले आहेत आणि त्याचा बोजा सामान्य ग्राहकांवर पडला आहे. राज्य सरकारने अनावश्यक खर्चांना कात्री लावली आहे. विरोधी सदस्यांचे मात्र या उत्तराने समाधान झाले नाही आणि त्यांनी सभात्याग केला.

Rjsthan minister targets BJP

महत्त्वाच्या बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top