Wednesday, 13 Jan, 7.20 pm The Focus India

होम
आता भारतीय लष्करात महिला पायलट ;ऑपरेशनल मिशनमध्ये उडवणार विमान

२०२२ पासून भारतीय लष्करात पायलट म्हणून महिलांना सामील करणार यावर्षी जुलैपासून प्रशिक्षण सुरू

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आपल्याकडे असे कोणतेच क्षेत्र नाही त्यात महिला काम करत नाही. एअर इंडियाच्या महिला पायलट जोयाने एक नवा इतिहास रचला .सॅन फ्रन्सिस्को ते बंगळूर असा १६ हजार किलोमीटरचा सर्वात मोठा हवाई प्रवास करून नवा विक्रम रचला आहे.त्यातच लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी महिलांसाठी महत्त्वाच्या आणि अभिमानाच्या निर्णयाची घोषणा केली आहे.Now in the Indian Army, women pilots will fly in operational missions

नौदल वायुदलानंतर आता लष्करातही महिला पायलट काम करताना आपल्याला दिसणार आहेत. नौदल आणि वायुदलानंतर आता लष्करदलाने हा निर्णय घेतला आहे. याआधी केवळ आर्मी एव्हगेशन ट्रफिक कंट्रोल विभागात महिला काम करत होत्या मात्र आता महिला लष्कारात पायलट म्हणून भूमिका बजावताना दिसणार आहेत असे लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी सांगितले.


है तैयार हम ..! पाकिस्तानला योग्य वेळी,योग्य ठिकाणी आणि योग्य उत्तर देणार


येत्या जुलै पासून महिलांना पायलटचे प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली जाणार आहे. या प्रशिक्षणात महिला अधिकाऱ्यांनाही ट्रेनिंग दिले जाणार असल्याचे नरवणे यांनी सांगितले आहे.

Now in the Indian Army, women pilots will fly in operational missions

गेल्या एक महिना आधीच मी याबाबत आदेश दिला आहे. आर्मी एव्हगेशन ट्रफिक कंट्रोल विभागात महिला केवळ ग्राऊंड ड्यूटी करतात. त्यामुळे आता महिलांना पायलट म्हणून घेण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला अधिकाऱ्यांना योग्य प्रक्षिण देऊन त्यांना पायलट म्हणून विमान उडवता येणार आहे. त्यासाठी जुलै महिन्यात या महिला अधिकांऱ्यांच्या पायलटचे प्रशिक्षण सुरू होईल.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: The Focus India
Top